सुप्रिम कोर्टाचा मोठा निर्णय : प्रजासत्ताक दिनी निघणाऱ्या 'शेतकरी ट्रॅक्टर मार्च'चा निर्णय दिल्ली पोलिसांनी घ्यावा

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 18 जानेवारी 2021

प्रजासत्ताक दिनी आंदोलक शेतकऱ्यांतर्फे काढण्यात येणारी ट्रॅक्टर रॅली हा कायदा व सुव्यवस्थेचा विषय असून याबाबत पोलिसांनी निर्णय घ्यावा, असे सर्वोच्च न्यायालयाने आज सांगितलं.

नवी दिल्ली :  प्रजासत्ताक दिनी आंदोलक शेतकऱ्यांतर्फे काढण्यात येणारी ट्रॅक्टर रॅली हा कायदा व सुव्यवस्थेचा विषय असून याबाबत पोलिसांनी निर्णय घ्यावा, असे सर्वोच्च न्यायालयाने आज सांगितलं. प्रस्तावित ट्रॅक्टर मेळावा हा कायदा व सुव्यवस्थेचा विषय असून याबाबत पोलिसांनी निर्णय घ्यावा, असे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सांगितले. शेतकऱअयांनी आखलेल्या ट्रॅक्टर रॅलीविरोधातील याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानेही या प्रकरणाला सामोरे जाण्याचा सर्व अधिकार असल्याचे केंद्राला सांगितले.

प्रजासत्ताक दिनी काढण्यात येणाऱ्या ट्रॅक्टर मोर्चावर शेतकरी ठाम

"दिल्लीत कोणास प्रवेश करण्याची परवानगी असावी हे ठरविण्याचा पहिला अधिकार दिल्ली पोलिसांना आहे. कोणाला प्रवेश करण्याची परवानगी दिली द्यावी आणि किती लोकांना द्यावी येईल या प्रश्नाचा निर्णय पोलिसांनी निर्णय घेतला पाहिजे,  त्यात आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही." असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

केंद्राला संबोधित करताना कोर्टाने सांगितले की, "तुम्ही काय करावे ते आम्ही तुम्हाला सांगणार नाही. आम्ही पुढील सुनावणी 20 जानेवारीला घेऊ. पोलिस कायद्यांतर्गत आपल्याकडे कोणते अधिकार आहेत हे सर्वोच्च न्यायालयाने सांगावे अशी केंद्र सरकारची इच्छा आहे का” अशा शब्दात सर्वोच्च न्यायलयाने केंद्र सरकारला फटकारले.

दरम्यान, जवळपास दोन महिन्यांपासून शेती कायद्याविरोधात आंदोलन करणारे शेतकरी प्रजासत्ताक दिनी प्रस्तावित ट्रॅक्टर मेळावा घेण्यावर ठाम आहेत आणि कृषी कायदे रद्द होईपर्यंत त्यांनी धरणे आंदोलन सुरू ठेवले आहे. शेतकरी कायद्यांबाबत शेतकरी आणि सरकार यांच्यात झालेल्या 9 व्या फेरी दरम्यान बीकेयू नेते राकेश टिकैत म्हणाले होते की सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यास शेतकरी प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर मेळावा मागे घेऊ. परंतु , आता प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर मेळावा घेण्याच्या आपल्या भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत.

सिंघू सीमेवरील निषेधस्थळी पत्रकार परिषद संबोधित करताना किसान युनियन नेते योगेंद्र यादव म्हणाले, "प्रजासत्ताक दिनी आम्ही दिल्लीच्या आउटर रिंग रोडवर ट्रॅक्टर परेड काढू." हा परेड अतिशय शांततापूर्ण असेल.प्रजासत्ताक दिन सोहळ्यात व्यत्यय आणणार नाही. दरम्यान, अधिकाधिक लोकांना 'किसान ट्रॅक्टर मार्च' मध्ये मोठ्या संख्येने सामील होण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी शेतकरी पंजाबच्या विविध भागात मॉक ट्रॅक्टर रॅली आयोजित करत आहेत.

 

संबंधित बातम्या