शेतकऱ्यांचे आज "रेल रोको" आंदोलन; प्रवाशांशी साधणार संवाद

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 18 फेब्रुवारी 2021

आज शेतकरी पुन्हा नवीन शेती कायद्याचा निषेध करण्यासाठी सरकारला आवाहन देणार आहेत. शेतकऱ्यांच्या वतीने रेल्वे रोको आंदोलन पुकारण्यात आले आहे.

नवी दिल्ली: आज शेतकरी पुन्हा नवीन शेती कायद्याचा निषेध करण्यासाठी सरकारला आवाहन देणार आहेत. शेतकऱ्यांच्या वतीने रेल्वे रोको आंदोलन पुकारण्यात आले आहे. आंदोलन करणारे शेतकरी सतत भारत सरकारशी बोलण्याची मागणी करत आहेत आणि या आंदोलनाला धार देण्याच्याही पर्यत्नात व्यस्त आहेत. आज संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने देशभरात रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

या वेळेत होणार रेल्वे रोको आंदोलन

दुपारी 12 ते सायंकाळी 4 या वेळेत शेतकरी जवळच्या रेल्वे स्थानकात जाऊन रेल्वे थांबवणार आहे. यावेळी शेतकरी प्रथम फुलांच्या हारांनी ट्रेनचे स्वागत करणार व त्यानंतर रेल्वे प्रवाशांशी संवाद साधणार आहे. या वेळी आंदोलन करणारे शेतकरी रेल्वे प्रवाशांसाठी पाणी, दूध आणि चहाची सोयसुद्धा उपलब्ध करणार आहेत. लहान मुलांसाठी दुधाची व्यवस्था केली जाणार आहे. 

प्रवाशांना केले आवाहन

बुधवारी भाकियूच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांनी सर्व युनियन कामगारांना दूध, चहा आणि पाण्याची व्यवस्था करून जवळच्या रेल्वे स्थानकात पोहोचण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, ट्रेन थांबवली असतांना शांतता ठेवा. तसेच रेल्वे प्रवाश्यांनी देखील शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी थोडा वेळ द्यावा व आंदोलनात सहकार्य करावे, असे आवाहन शेतकऱ्यांनी केले आहे. 

शेतकरी साधणार प्रवाशांशी संवाद

आंदोलन करणारे शेतकरी रेल्वे स्थानकांना भेट देऊन रेल्वे प्रवाशांशी संवाद साधणार आणि त्यांना सांगणार की, देशाचा अन्नदाता ज्याला आपल्या शेतात असायला पाहिजे होते पण गेल्या तीन महिन्यापासून तो दिल्लीच्या सीमेवर पडून आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर भारत सरकारने गांभीर्याने विचार करावा यासाठी ते रेल्वे प्रवाशांना पाठिंब्याचे आवाहन करणार आहेत. 

"गुरुवारी सोशल मीडियावर शेतकऱ्यांना योग्य माहिती देण्यासाठी व रेल्वे स्थानक आंदोलन यशस्वी करण्यासाठी सोशल मीडियावर शेतकऱ्यांना  मोहिमेस अधिक बळकट केले जात आहे. काल बुधवारी शेतकर्‍यांना सोशल मीडियाची माहिती देण्यात आली," असे गाझीपूर सीमा आंदोलन समितीचे सदस्य जगतारसिंग बाजवा म्हणाले.

टिकैत म्हणाले - सर्व राज्यात जाईल

उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थानमध्ये आम्ही सातत्याने महापंचायत करीत आहोत. या पंचायतींमध्ये आम्हाला शेतकरी व मजुरांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. किसान पंचायतींची मालिका सुरूच राहणार आहे. आम्ही देशातील सर्व राज्यांत जाऊन शेतकऱ्यांना आपल्या चळवळीशी जोडू.  गुजरात, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि अगदी केरळ अशी दक्षिणेकडील राज्ये शेतकरी चळवळीत सामील होत आहेत आणि त्यांच्या राज्यांतील किसान पंचायतींसाठी वेळ मागितला आहे. ते सर्व राज्यांतील पंचायतींना भेट देतील आणि सरकारने लागू केलेल्या नवीन कृषी कायद्यांबाबत शेतकऱ्यांना जागरूक करण्याचे काम करतील. लोकं पश्चिम बंगालहून सतत संपर्क साधत आहे आणि तिथे पंचायत करायच्या आहेत असे म्हणत आहेत. लवकरच उत्तर प्रदेशातील लोकांना कृषी कायद्याविषयी माहिती देऊन पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत," असे राकेश टिकैट म्हणाले.

 

 

संबंधित बातम्या