फारुख अब्दुल्लांची ‘ईडी’कडून चौकशी

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020

जम्मू-काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री व नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारुख अब्दुल्ला यांची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी चौकशी सुरू केली आहे. जम्मू-काश्‍मीर क्रिकेट संघटनेच्या (जेकेसीए) ४३.६९ कोटी रुपयांचा अपहार केल्याच्या आरोपावरून ही चौकशी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री व नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारुख अब्दुल्ला यांची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी चौकशी सुरू केली आहे. जम्मू-काश्‍मीर क्रिकेट संघटनेच्या (जेकेसीए) ४३.६९ कोटी रुपयांचा अपहार केल्याच्या आरोपावरून ही चौकशी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

डॉ. अब्दुल्ला यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्या (पीएमएलए) अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यात डॉ. अब्दुल्ला यांची जबानी नोंदविण्यात येणार आहे.  ‘जेकेसीए’ पदाधिकारी असताना गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) त्यांच्यावर ‘एफआयआर’ दाखल केला होता. अब्दुल्ला यांच्यासह संघटनेचे सरचिटणीस मोहमंद सलीम खान आणि माजी खजिनदार अहसान अहमद मिर्झा यांच्यावरही ‘सीबीआय’ने गुन्हा दाखल केला आहे.
 

संबंधित बातम्या