''काँग्रेस ही कमकुवत झाली असून त्यांनी घरी बसून चालणार नाही''

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 23 मार्च 2021

विविध राज्यात आणि केंद्रात बरीच वर्षे सत्तेत राहिलेल्या कॉंग्रेस पक्षाची कामगिरी मागील काही वर्षांपासून खालावलेली आहे. गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत कांग्रेस पक्षाची अवस्था बिकट झाल्याचे सर्वांनाच पाहायला मिळाले.

विविध राज्यात आणि केंद्रात बरीच वर्षे सत्तेत राहिलेल्या कॉंग्रेस पक्षाची कामगिरी मागील काही वर्षांपासून खालावलेली आहे. गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत कांग्रेस पक्षाची अवस्था बिकट झाल्याचे सर्वांनाच पाहायला मिळाले. लोकसभा निवडणुकीनंतर अनेक राज्यांमध्ये देखील काँग्रेस पक्षाला आपली सत्ता गमवावी लागलेली आहे. त्यानंतर आता जम्मू काश्मीर मधील नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला यांनी देखील काँग्रेसवर निशाणा साधला आहे. फारूक अब्दुल्ला यांनी काँग्रेस बाबत बोलताना हा पक्ष सध्याच्या घडीला कमकुवत झाला असल्याचे म्हटले आहे. (Farooq Abdullah said that Congress has become weak)

माजी केंद्रीय मंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला यांनी काँग्रेसच्या सध्याच्या स्थितीवर भाष्य करताना, काँग्रेस हा कमकुवत झाला असल्याचे म्हटले आहे. त्याशिवाय प्रामाणिकपणे आपण हे वक्तव्य करत असल्याचे म्हणत, काँग्रेसला घरी बसून चालणार नसल्याचे फारूक अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. तसेच त्यांना देश वाचवायचा असेल तर कॉंग्रेसला उठून उभे राहावे लागणार असल्याचे मत फारूक अब्दुल्ला यांनी व्यक्त केले आहे. इतकेच नव्हे तर काँग्रेस पक्षाला अधिक मजबूतपणे उभे राहावे लागणार असल्याचे त्यांनी पुढे म्हटले आहे. यानंतर, काँग्रेसला जनतेच्या समस्या जाणून घ्याव्या लागणार असल्याचे नमूद करत, हे सर्व घरी बसून होणार नसल्याचे फारूक अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. 

OTT Platforms संदर्भात केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल 

यापूर्वी, फारूक अब्दुल्ला यांनी भारतीय जनता पक्षावर देखील जोरदार टीका केली होती. भाजपने अलीकडेच सरकार स्थापन करू असे म्हटले होते. मात्र आपण त्यांच्या मार्गात उभे राहणार असून, भाजप आपल्याला कसे हटवणार, असा सवाल फारूक अब्दुल्ला यांनी उपस्थित केला होता. तसेच, नॅशनल कॉन्फरन्समध्ये त्याग करण्याचा इतिहास असल्याचे म्हणत, आपला पक्ष जनतेच्या मनात राहत असल्याचे फारूक अब्दुल्ला यांनी म्हटले होते. याव्यतिरिक्त, भारतीय जनता पक्षावर अप्रत्यक्षपणे टीका करताना हा पक्ष जनतेत द्वेष पसरवत असल्याचे त्यांनी म्हटले होते.   

दरम्यान, यापूर्वी काँग्रेस पक्षातीलच काही ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेस पक्ष हा कमकुवत झाला असल्याची कबुली दिली होती. काँग्रेस पक्षातील राज्यसभेचे माजी खासदार आणि नेते गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल आणि आनंद शर्मा यांनी जम्मू आणि काश्मीर येथे झालेल्या काँग्रेस जी-23 बैठकीत याबाबत आपले मत मांडले होते.        

संबंधित बातम्या