फारुक अब्दुलांचा व्हिडिओ होतोय व्हयरल; जाणून घ्या

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मार्च 2021

‘आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर’, ‘गुलाबी आंखे तेरी देखी’ या गाण्यावर या दोन नेत्यांनी मनमुराद असा डान्स केला आहे.

नवी दिल्ली : नॅशनल कॉन्फरसचे नेते फारुक अब्दुल्ला हे नेहमी त्यांच्या राजकिय वक्तव्यांसाठी चर्चेत असतात. मात्र नुकतेच त्यांचे दिल्लीमध्ये वेगळेच रुप पहायला मिळाले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नातीच्या लग्नात ते  जुन्या चित्रपटांमधील गाण्यावर थिरकताना सर्वांना पहायला मिळाले. फारुक अब्दुला स्वत:च नाचले नाहीतर ते कॅप्टन अमरिंदर सिंग यांनाही त्यांनी नाचवलं. या दोन्ही नेत्यांनी शम्मी कपूर य़ांच्या एका फिल्मधील गाण्यावर डान्स केला आहे. ‘आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर’, ‘गुलाबी आंखे तेरी देखी’ या गाण्यावर या दोन नेत्यांनी मनमुराद असा डान्स केला आहे. फारुक अब्दुल्लांचा डान्स करतानाचा व्हिडिओ तूफान व्हायरल झाला आहे.

'मेट्रो मॅन' ई श्रीधरन केरळ विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचे...

मागच्या आठवड्यात पंजाबचे मुख्समंत्री अमरिंदर सिंग यांची नात सरहइंदर कौर हिचा विवाहसोहळा दिल्लीमध्ये पार पाडला. या विवाहसोहळ्यानिमित्त आयोजित कोलेल्या पार्टीमध्ये राजकारणातील अनेक मोठे नेते सहभागी झाले होते. 'गुलाबी आंखे तेरी देखी' या गाण्यावर फारुक अब्दुल्ला पहिल्यांदा थिरकले त्यानंतर ते 'आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे है जुबान पर'  हे गाणं लागल्यानंतर त्यांनी मुख्य़मंत्री अमरिंदर सिंग यांच्याबरोबर त्यांनी डान्स केला. या दोघांबरोबर पार्टीमध्ये सहभागी झालेले इतर नेतेही थिरकताना दिसले.
त्य़ांचा हा डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर हजारोंच्या संख्येत शेअर केला गेला. कॉंग्रेसच्या सोशल मिडिया विभागाचे नेते सरल पटेल यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

''फारुख अब्दुल्ला आणि मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी सिद्ध करुन दाखवलं आहे आहे की, वय केवळ आकड्यात असतं,'' अशा प्रकारचे ट्विट केले आहे.

 

संबंधित बातम्या