पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय मंत्र्याच्या ताफ्यावर लाठ्या काठ्यांंनी हल्ला केला; पहा व्हिडीओ

दैनिक गोमंतक
गुरुवार, 6 मे 2021

पश्चिम बंगालमध्ये 2 मी रोजी विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यापासून राज्यातील अनेक ठिकाणी हिंसक  कारवाया सुरु असल्याचे समोर आले आहे.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर मोठी हिंसा सुरु असल्याचे पाहायला मिळते आहे. या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गृह मंत्रालयाने गठीत केलेली-सदस्यांची समिती सध्या पश्चिम बंगालमध्ये पोहोचली आहे. ही समिती राज्यातील निवडणुकांनंतर उद्भवलेल्या हिंसाचाराची स्थितीचा आढावा घेणार आहे. या परिस्थितीचा आढावा घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश मंत्रालयाकडून दिले आहेत. या व्यतिरिक्त गृह मंत्रालयाने राज्यपाल जगदीप धनखार यांच्याकडे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेविषयी अहवालही मागविला आहे. मात्र आता थेट केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन यांच्यावर जमावाने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. (Fatal attack on Union Minister's convoy in West Bengal)

केंद्रीय मंत्री (Central Minister) व्ही. मुरलीधरन (V Murleedharan) यांनी तृणमूल काँग्रेसच्या (Trinmool Congress) कार्यकर्त्यांनी आपल्या ताफ्यावर हल्ला केल्याचा आरोप केला आहे.यावेळी एक व्हिडीओ ट्वीट करत , 'टीएमसीच्या (TMC) गुंडांनी पश्चिम मेदीनीपूरमध्ये आपल्या ताफ्यावर हल्ला केला, खिडक्या फोडून खासगी कर्मचार्‍यांवर हल्ला केला. त्यामुळे आपण हा प्रवास थांबवत आहोत.' अशी माहिती दिली आहे. बंगालमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या चौकशीसाठी गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची एक समिती आज बंगालमध्ये पोहोचली आहे. अतिरिक्त सचिव रँकच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती राज्यातील निवडणुका झाल्यानंतर झालेल्या हिंसाचाराच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पश्चिम बंगालला रवाना झाले असल्याची माहिती गृहविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये यांच्या ताफ्यावर काही लोकांनी लाठ्या काठ्या घेऊन हल्ला केला असल्याचे पाहायला मिळते आहे. तर या घनेनंतर श्रीधरन यांनी तृणमूलच्या कार्यकर्त्यांवर हल्ल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये(West Bengal) 2 मी रोजी विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यापासून राज्यातील अनेक ठिकाणी हिंसक (Violence) कारवाया सुरु असल्याचे समोर आले आहे. 

संबंधित बातम्या