बापाने केला मुलीचा शिरच्छेद; डोकं हातात घेऊन गाठलं पोलिस स्टेशन

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 4 मार्च 2021

काल बुधवारी सकाळी उत्तर प्रदेश मधील हरदोई जिल्ह्यातील एका गावात रस्त्यात एका व्यक्तीला हातात कापलेले शीर घेवून जातांना पाहिले अशा परिस्थितीत तेव्हा गावातील लोक घाबरून गेले.

लखनऊ:  काल बुधवारी सकाळी उत्तर प्रदेश मधील हरदोई जिल्ह्यातील एका गावात रस्त्यात एका व्यक्तीला हातात कापलेले शीर घेवून जातांना पाहिले अशा परिस्थितीत तेव्हा गावातील लोक घाबरून गेले. त्या व्यक्तीने चक्क आपल्या 17 वर्षाच्या मुलीचे शीर कापले होते.  लखनौपासून सुमारे 200 किमी अंतरावर पांडेयात्र गावात ही खळबळ उडाली आहे. सर्वेश कुमार असे या व्यक्तीचे नाव आहे. त्याने मुलीचा शीरच्छेद करून मुलीचे कापलेले डोके हातात घेवून पोलिस स्टेशन गाठले.

हरदोई जिल्ह्यातील माझीला पोलिस स्टेशन भागात ही घटना घडली. सर्वेश कुमारने स्वत: आपल्या मुलीचाशिरच्छेद करून तिची हत्या केली. त्याने पोलिसांना सांगितले की आपल्या मुलीच्या प्रेमसंबंधाबद्दल तो नाराज आहे, म्हणून त्याने मुलीची हत्या केली.  जेव्हा तो पोलिस स्टेशनला पोहचला तेव्हा दोन अधिकाऱ्यांनी त्याचा व्हिडिओ बनवून त्याचे नाव विचारले. त्याला त्याच्या निवासस्थानाबद्दल विचारले आणि तो कोणाचे डोके घेवून फिरत आहे हे विचारले. सर्वेश कुमार यांनी या सर्व प्रश्नांची न डगमगता उत्तरे दिले.  

मायक्रोसॉफ्ट चीनविरोधात मैदानात; केला सायबर हल्ल्याचा गंभीर आरोप

व्हिडिओमध्ये असे दिसून आले आहे की त्याने कबूल केले आहे की, तो आपल्या मुलीचे एका मुलाशी असलेल्या संबंधाबद्दल नाराज होता. म्हणून त्याने धारदार शस्त्राने आपल्या मुलीचा शिरच्छेद केला. तो म्हणाला, "मी स्वत: हे केले, दुसरे कोणी नाही मी आतुन दार बंद केले आणि तीचा गळा कापला, मृतदेह खोलीत आहे.” पोलिसांनी सर्वेशला डोके खाली ठेवून रस्त्यावर बसण्यास सांगितले, तो बसला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिस त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करत आहेत.

संबंधित बातम्या