Viral News: मुलीच्या लग्नात जबाबदारी विसरुन बापानेच बांधल्या मुंडावळ्या, Love Story

Wedding At Old Age: यूट्यूबवर एक अनोखी प्रेमकथा लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.
Marriage
MarriageDainik Gomantak

Social Media Viral News: यूट्यूबवर एक अनोखी प्रेमकथा लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. त्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, मला लग्न करायचे नव्हते, परंतु मुलींच्या आग्रहापुढे माझे एक चालले नाही. त्या व्यक्तीने पुढे सांगितले की, दोन्ही मुलींचे लग्नही त्याच दिवशी झाले.

11 मुलांचा बाप विवाहित

शौकत असे या व्यक्तीचे नाव सांगितले जात आहे. त्याचे वय 56 वर्षे असून आतापर्यंत त्याने पाच लग्ने केली आहेत. त्याला 11 मुले आहेत, त्यापैकी 10 मुली आणि एक मुलगा आहे. मुलासह 8 मुलींचीही (Girls) लग्ने झाली आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, मुलींनी त्यांच्या वडिलांसाठी नवीन वधू शोधली आहे.

Marriage
Viral Video : खतरनाक! तो 23 मजली इमारतीवरून आरामात उड्या मारत होता; अन्...

स्वतःची प्रेमकथा सांगितली

शौकतच्या म्हणण्यानुसार, घरात आता दोन मुली अविवाहित आहेत. पण त्यांचे लग्न झाल्यानंतर घर ओसाड पडेल. शौकतच्या मुलींनीही असाच विचार करुन आपल्या वडिलांसाठी वधू शोधून पाचव्यांदा लग्न (Marriage) लावून दिले. खरे तर शौकतच्या चार बायका मरण पावल्या आहेत. त्यामुळेच मुलींनी त्यांचे पुन्हा लग्न लावून दिले.

Marriage
Viral Video : 'हम किसी से कम हैं क्या?' म्हणत स्त्रिया चक्क साडीत खेळल्या कबड्डी

कुटुंबात एकूण 62 सदस्य आहेत

शौकतच्या कुटुंबात एकूण 62 सदस्य आहेत. कुटुंबासाठी 100 रोट्या घरी बनवल्या जातात. या वातावरणाशी मी हळूहळू जुळवून घेईन, असे त्याची पत्नी सांगते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com