Crime News: शिक्षक बापच ठरला पोटच्या मुलीचा कर्दनकाळ, नंतर त्यानेही...

UP Crime News: उत्तर प्रदेशातील कासगंजमध्ये बापच आपल्या मुलीचा कर्दनकाळ ठरला. सरकारी महाविद्यालयातील शिक्षकाने आपल्या मुलीची गोळ्या झाडून हत्या केली.
Crime News
Crime NewsDainik Gomantak

UP Crime News: उत्तर प्रदेशातील कासगंजमध्ये बापच आपल्या मुलीचा कर्दनकाळ ठरला. सरकारी महाविद्यालयातील शिक्षकाने आपल्या मुलीची गोळ्या झाडून हत्या केली. पुढे त्यानेही आत्महत्या केली.

मुलीच्या प्रेमविवाहाच्या हट्टापायी वडिलांनी हे पाऊल उचलले. मैनपुरी जिल्ह्यातील रहिवासी असलेले नरेंद्र सिंह यादव कासगंजच्या नागरिया येथील शेरवानी इंटर कॉलेजमध्ये शिकवायचे. ते शहरातील सदर कोतवाली परिसरात असलेल्या आवास विकास कॉलनीत राहत होते.

मुलीचे बोलणे वडिलांना आवडले नाही

नरेंद्र यादव यांच्याशिवाय त्यांची पत्नी शशी यादव, मुलगी जुही यादव आणि एक मुलगा घरात राहत होते. नरेंद्र यादव कासगंजच्या नागरिया येथील शेरवानी इंटर कॉलेजमध्ये शिकवायचे. जुहीला तिच्या आवडीच्या मुलाशी लग्न (Marriage) करायचे होते.

मात्र, तिची ही गोष्ट वडिलांना आवडली नाही. त्यांनी तिला खूप समजावले, पण ती आपल्या मतावर ठाम होती.

Crime News
Uttar Pradesh: कारखाण्याचे शटर कोसळून एका मजुराचा मृत्‍यू; 8 जण जखमी

दुसरीकडे, जुहीने तिच्या वडिलांना उत्तर देताना सांगितले की, 'मी शिक्षित आहे, मी स्वतः निर्णय घेऊ शकते, कारण मी माझ्या पायावर उभी आहे.' जुहीचे हे बोलणे ऐकून वडील नरेंद्र संतापले. त्यांनी थेट आपल्या जन्मदात्या मुलीवर गोळी झाडली.

Crime News
Uttar Pradesh: 'तो यूपीमधून मुलांचे अपहरण करुन...', मानवी तस्कराच्या कबुलीने उडाली खळबळ

तसेच, घटनेची माहिती मिळताच पोलीस (Police) अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत.

नरेंद्र यादव यांची पत्नी शशी यांनी सांगितले की, 'नरेंद्र यांचे जुहीसोबत कौटुंबिक वादातून भांडण झाले होते. वाद वाढल्यानंतर नरेंद्र यांनी रागाच्या भरात जुहीवर गोळी झाडली आणि नंतर त्यांनीही स्वतःवर गोळी झाडली.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com