कोरोनाच्या भीतीने दिल्ली- पुण्यातील मजूर कामगार पुन्हा आपापल्या घराकडे रवाना 

कोरोनाच्या भीतीने दिल्ली- पुण्यातील मजूर कामगार पुन्हा आपापल्या घराकडे रवाना 
labour.jpg

गेल्या वर्षी कोरोनाच्या महामारीच्या काळात देशातील नागरिकांना अनेक संकटांचा सामना करावा  लागला. जसजसा कोरोनाच प्रादुर्भाव वाढत होता, तसतसे निर्बंध आणि लॉकडाऊन अधिक कडक करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरवात झाली आहे. केंद्र सरकारने अनेक राज्यांमध्ये सक्तीचे लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र, दिल्ली, उत्तरप्रदेश, गुजरात सारख्या राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. कोरोनाच्या या धास्तीने पुणे-दिल्लीसह इतर भागातील परप्रांतीय मजूर कामगार आपापल्या घराकडे निघल्याचे दिसत आहे.  (Fearing corona, Delhi-Pune laborers return to their homes) 

बुधवारी दिल्लीतील आनंद विहार टर्मिनलमध्ये मोठ्या संख्येने परप्रांतीय कामगार आपल्या घरी जाताना दिसले. गेल्या वर्षी आम्ही लॉकडाऊनमध्ये अडकलो होतो, यावर्षी पुन्हा अशा परिस्थितीत अडकण्याची आमची इच्छा नाही, म्हणून आम्ही घरी जात आहोत, असे मत बिहारमधील कामगारांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, कोरोना संकटामुळे दिल्लीत रात्रीच्या वेळी कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. याशिवाय इतरही अनेक निर्बंध लावण्यात आले  आहेत. तथापि, दिल्लीतील कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे आणि लॉकडाऊनच्या भीतीमुळे परप्रांतीय कामगारांनी पुन्हा प्रवासी कामगारांनी आपापल्या घराची वाट धरली आहे. 

असेच काहीसे  चित्र महाराष्ट्रातही पहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात देशभरातून परप्रांतीय कामगार जात असतात. त्यांनीही आपापल्या घराची वाट धरली आहे. पुण्यातील पुणे रेल्वे स्थानकावरही परप्रांतीय कामगारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. तर कोरोना प्रतिबंधक नियमांचे पूर्णपणे पालन केले जात असल्याची प्रतिक्रिया रेल्वे विभागाने दिली आहे.  

पुन्हा लॉकडाउनची भीती?
विशेष म्हणजे दिल्ली, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश यासारख्या अनेक राज्यांनी आपल्या शहरांमध्ये नाईट कर्फ्यू लागू केला आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेशातही शनिवार व रविवार कडक लॉकडाउन लावण्यात आला आहे. तर छत्तीसगडच्या रायपूरमध्ये संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. अशा परिस्थितीत परप्रांतीय नागरिकांना पूनह लॉकडाऊनची भीती सतावू लागली आहे. दरम्यान, गेल्या वर्षी अचानक लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यामुळे लाखो परप्रांतीय कामगार शहरात अडकले होते. त्यानंतर आपापल्या घराकडे परतणाऱ्या प्रवासी कामगारांची प्रचंड गर्दी  संपूर्ण देशाने पहिली. 

कोरोनाचा अनियंत्रित वेगाने महाराष्ट्र-दिल्ली त्रस्त 
दरम्यान, यावेळीही, देशात कोरोनाची दुसरी लाट अनियंत्रित झाली आहे. गुरुवारी देशात सुमारे 1.25 लाख कोरोनाच्या रुग्णांची नोंद करण्यात आली. कोरोनाच्या  वाढत्या प्रकरणांमुळे बर्‍याच राज्यांनी त्यांच्या सीमेवर निर्बंध घातले आहेत, कोरोना टेस्टसारख्या अटी प्रवेशासाठी अनिवार्य केल्या आहेत. याहून चिंताजनक बाब म्हणजे,  सर्वात मोठे संकट महाराष्ट्रात आहे.  महाराष्ट्रात एकाच दिवसात जवळपास 60 हजार प्रकरणे नोंदवली गेली आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात दररोज 50 हजारांहून अधिक प्रकरणे समोर येत आहेत. तर दिल्लीतही एकाच दिवसांत साडेपाच हजार नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.जी या वर्षातील सर्वांत मोठी आकडेवारी आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com