सामना दोन साथींबरोबर

PTI
रविवार, 12 जुलै 2020

पावसाळ्यात डेंग्यूचा धोका असल्याने सावधानतेचा इशारा

नवी दिल्ली

कोरोनापासून बचाव हे एकच आव्हान समोर ठेवून स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारतीयांसमोर एक नवे आव्हान उभे ठाकले आहे. पावसाळा सुरू होत असल्याने डासांच्या चावण्यामुळे पसरणाऱ्या डेंग्यूच्या साथीचा हा मोसम चिंता वाढविणारा ठरू शकतो. कोरोना आणि डेंग्यू यांची काही लक्षणे समानच असल्याने देशातील आरोग्य यंत्रणा या दोन्ही साथींचा मुकाबला करण्यास कितपत सक्षम आहे, याबाबत तज्ज्ञांनी साशंकता व्यक्त केली आहे.

समान लक्षणे
ताप, अंगदुखी, डोकेदुखी

रुग्णसंख्येची तुलना
भारतात सध्या कोरोनाचे ८ लाख २१ हजारांहून अधिक रुग्ण असून २२ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. २०१६ ते २०१९ मधील आकडेवारीनुसार, देशात दरवर्षी १ ते २ लाख जणांना डेंग्यू होतो. २०१९ मध्ये १,३६,४२२ जणांना डेंग्यू झाला होता आणि १३२ जणांचा मृत्यू झाला होता.

चिंतेची कारणे
- सलग तीन दिवस ताप आल्यास दोन निदान चाचण्या कराव्या लागणार
- रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार
- कोरोना किंवा डेंग्यू झाल्यास रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होत असल्याने एकामुळे दुसरा आजार होण्याची शक्यता

आरोग्य यंत्रणेसमोरील आव्हाने
- कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता डेंग्यूच्या रुग्णांसाठी रुग्णालयांत खाटा रिकाम्या राहणार का?
- फक्त गंभीर रुग्णांनाच तपासले जाणार का?
- दोन्ही आजारांवर उपचार करण्याइतपत वैद्यकीय मनुष्यबळ आहे का?
- सध्या सर्वत्र कोरोनाचे वातावरण असल्याने डेंग्यूचे निदान होऊन त्यावर उपचार होणार का?

काय करता येईल?
- डेंग्यूसाठी वेगवान निदान चाचणी उपलब्ध करून वेळेत निर्णय घेणे (एनएस १ ही चांगली चाचणी आपल्याकडे आहे)
- अद्याप डेंग्यू साथीचा काळ थोडा दूर असल्याने आत्तापासून त्यासाठी आरोग्य यंत्रणेला सज्ज करणे
- लोकांनी स्वतःबरोबरच सार्वजनिक आरोग्याकडे लक्ष द्यावे
- स्वच्छता आणि इतर बाबींमध्ये सरकारने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करणे आवश्यक

डेंग्यूच्या काळामुळे कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणखी बिघडू शकते. याबाबत सविस्तर अभ्यास झालेला नाही, मात्र दक्षिण अमेरिकेत अशाच परिस्थितीमुळे बिकट अवस्था झाली होती.
- ध्रुवज्योती चटोपाध्याय, विषाणू तज्ज्ञ

संपादन - अवित बगळे

संबंधित बातम्या