'अखेर पुदुचेरीत राष्ट्रपती राजवट लागू'

Finally presidential rule was imposed in Puducherry
Finally presidential rule was imposed in Puducherry

पुदुचेरी: पुदुचेरीतील राजकिय सत्तानाट्य अखेर राष्ट्रपती राजवटीने थांबल. गेल्या काही दिवसांपासून पुदुचेरीत राजकिय चर्चांना उधान आलं होतं. पुदुचेरीमधील व्ही. नारायणस्वामी सरकारमधील काही आमदारांनी कॉंग्रेसचा निरोप घेतला होता. त्यामुळे कॉंग्रेस सरकारला सोमवारी विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाव लागलं. विश्वासदर्शक ठराव मांडण्यापूर्वी एक दिवसाचे अधिवेशन बोलावण्यात आले होते. मात्र अल्पमतात आलेले व्ही. नारायणस्वामी सरकार बहुमत सिध्द करण्य़ाआगोदरच कोसळलं.

कॉंग्रेस आणि द्रमुक पक्षाच्या प्रत्येकी एका आमदाराच्या राजीनाम्य़ामुळे 33 सदस्य संख्या असणाऱ्या पुदुचेरी विधानसभेत सत्तारुढ नारायणस्वामी सरकारचे संख्याबळ 11 पर्यंत घसरले. तर दुसरीकडे विरोधी आघाडीचे संख्याबळ 14 तर सात जागा रिक्त आहेत. यामुळे व्ही. नारायणस्वामी सरकारला बहुमत सिध्द करण्याची वेळ आली होती. मात्र विश्वासदर्शक ठरावात सत्तारुढ पक्षाला बहुमत सिध्द न करता आल्यामुळे अखेर सरकारला पाय़उतार व्हावं लागलं.

कॉग्रेस सरकारला 11 विरुध्द 11 अशा मतांनी पराभवाला सामोरं जावं लागलं. विश्वासदर्शक ठराव मांडण्यापूर्वी एक दिवसाचे अधिवेशन बोलवण्यात आले होते. अधिवेशनाला सुरुवात होताच व्ही. नारायणस्वामी सरकारने विश्वासदर्शक ठराव मांडला मात्र काही वेळातच सत्ताधारी आमदारांनी सभात्याग केला. त्यानंतर कॉंग्रेस अध्यक्षांनी नारायणस्वामी सरकार अल्पमतात आल्याचे मान्य केले. आणि शेवटी व्ही. नारायणस्वामी यांनी आपल्य़ा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपुर्द केला.  

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com