मोफत लशीच्या घोषणेचे अर्थमंत्र्यांकडून समर्थन

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

 भाजपच्या जाहीरनाम्यात बिहारी लोकांना कोरोनाची लस मोफत देण्याचे जे आश्‍वासन दिले ते पूर्णपणे निवडणूक नियमांना धरून आहे,  असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या वादग्रस्त घोषणेचे आज समर्थन केले.

नवी दिल्ली :  भाजपच्या जाहीरनाम्यात बिहारी लोकांना कोरोनाची लस मोफत देण्याचे जे आश्‍वासन दिले ते पूर्णपणे निवडणूक नियमांना धरून आहे,  असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या वादग्रस्त घोषणेचे आज समर्थन केले. मात्र अर्थमंत्र्यांची सूचना नियमांनुसारच असेल तर, त्यांच्या त्या’ वक्तव्याचा विपर्यास केला गेला, असे खुलासे भाजपमधून काही तास उलटण्याच्या आत त्वरेने का करण्यात आले,

याचे उत्तर त्यांनी दिले नाही. त्या म्हणाल्या, की लशीबाबतचे आश्‍वासन व वक्तव्य नियमांना धरून आहे, असे सांगितले. कोरोनावरील लसीचे वाटप आपापल्या राज्यांना मोफत करायचे की त्यासाठी शुल्क आकारायचे हा राज्यांच्याच अखत्यारितील विषय आहे. भाजपचे सरकार बिहारमध्ये सत्तेवर आले तर लस मोफत देऊ असे मी म्हटले होते. कोणताही पक्ष निवडणुकीत आश्‍वासने देऊ शकतो.  

संबंधित बातम्या