Budget 2021 News updates : अर्थमंत्र्यांकडून वाहनांसाठीची स्वैच्छिक वाहन स्क्रॅपिंग योजना जाहीर  

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021

वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी पुढील आथिर्क वर्ष 2021-22 साठीचा अर्थसंकल्प सादर करताना जुन्या आणि नादुरुस्त वाहनांसाठीची स्वैच्छिक वाहन स्क्रॅपिंग धोरण योजना जाहीर केली आहे.

वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी पुढील आथिर्क वर्ष 2021-22 साठीचा अर्थसंकल्प सादर करताना जुन्या आणि नादुरुस्त वाहनांसाठीची स्वैच्छिक वाहन स्क्रॅपिंग धोरण योजना जाहीर केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केलेल्या या धोरणानुसार वैयक्तिक वाहनांची 20 वर्षानंतर आणि कमर्शियल वाहनांची 15 वर्षानंतर ऑटोमेटेड केंद्रांमध्ये फिटनेस टेस्ट घेता येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 

Union Budget2021-22 : आरोग्यासाठी निर्मला सीतारमण यांच्याकडून नव्या आत्मनिर्भर...

जुन्या आणि नादुरुस्त वाहनांचा प्रश्न सोडविण्यासाठी स्वैच्छिक वाहन स्क्रॅपिंग धोरण जाहीर करीत असल्याचे निर्मला सीतारमण यांनी सांगितले. तसेच या धोरणामुळे इंधन-कार्यक्षम, पर्यावरणास अनुकूल वाहनांना चालना मिळण्यास मदत होणार असल्याची माहिती निर्मला सीतारमण यांनी यावेळी दिली. शिवाय यामुळे वाहनांचे प्रदूषण आणि इंधनाची बचत होऊन आयातीवर प्रभाव पडणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी संसदेत म्हटले आहे. तसेच वैयक्तिक वाहनांच्या बाबतीत 20 वर्षानंतर आणि व्यावसायिक वाहनांच्या बाबतीत 15 वर्षानंतर फिटनेस टेस्ट करता येणार असल्याचे निर्मला सीतारमण म्हणाल्या. 

काही दिवसांपूर्वीच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पर्यावरणाला प्रदूषित करणाऱ्या जुन्या वाहनांवर 'ग्रीन टॅक्स' लावण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली होती. जुन्या वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाला अटकाव करण्यासाठी म्हणून 'ग्रीन टॅक्स' आकारण्याच्या प्रस्तावाला नितीन गडकरी यांनी मान्यता दिल्याचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने म्हटले होते. फिटनेस प्रमाणपत्र नूतनीकरणाच्या वेळी 8 वर्षांपेक्षा जुन्या वाहनांवर रस्ता कराच्या 10% ते 25% ग्रीन टॅक्स आकारला जाऊ शकतो, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात न्मूड केले होते. 

दरम्यान, निर्मला सीतारमण यांनी आगामी अर्थसंकल्प हा आत्मनिर्भर भारताला अधिक बळकट करण्यासाठी असल्याचे सांगितले. यंदाचा अर्थसंकल्प हा  शेतकऱ्यांचे उत्पन्न डबल करणे, मजबूत पायाभूत सोयी-सुविधा, महिला सक्षमीकरण, निरोगी भारत, सुशासन, सर्वांसाठी शिक्षण, सर्वसमावेशक विकासासाठी असल्याची माहिती निर्मला सीतारमण यांनी संसदेत दिली.           

संबंधित बातम्या