केंद्रीय अर्थमंत्री 'या' मुद्द्यांवर साधणार देशातील सर्व मुखमंत्र्यांशी संवाद

COVID-19 च्या लहरींनंतर अर्थव्यवस्थेचे जलद पुनरुज्जीवन आणि भांडवली खर्च वाढवण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली आहे
केंद्रीय अर्थमंत्री 'या' मुद्द्यांवर साधणार देशातील सर्व मुखमंत्र्यांशी संवाद
Dainik GomantakFinance Minister Nirmala Sitharaman meeting with all Chief Ministers

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) आज देशातील सर्व राज्याचे मुख्यमंत्री (Chief Ministers) आणि अर्थमंत्र्यांसोबत (Finance Minister) एक महत्वाची बैठक घेणार आहेत. या बैठकीत अर्थमंत्री राज्यातील व्यवसायासाठी पोषक असे वातावरण तयार करण्यासाठी आणि गुंतवणूकदारांना राज्यात आकर्षित करण्याच्या मार्गांवर चर्चा केली जाईल, जेणेकरून देशाच्या विकासाला चालना मिळू शकेल.याबाबत अर्थ मंत्रालयाने ट्विट करून माहिती दिली की 15 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या ऑनलाईन बैठकीत अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी आणि भागवत कराड देखील सहभागी होतील. याशिवाय केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांचे सचिव, राज्यांचे मुख्य सचिव आणि वित्त सचिवही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.(Finance Minister Nirmala Sitharaman meeting with all Chief Ministers)

यासोबतच केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सांगितले की, "गुंतवणूक वाढवण्यासाठी अनुकूल परिसंस्था निर्माण करणे हा बैठकीतील चर्चेचा महत्वाचा विषय असेल. याशिवाय वृद्धी, सुधारणा, गुंतवणुकीला चालना देण्यासाठी आणि सुधारणांवर आधारित व्यवसाय वातावरण निर्माण करण्यासाठीच्या उपाययोजनांवर या बैठकीत चर्चा होणार आहे.

COVID-19 च्या लहरींनंतर अर्थव्यवस्थेचे जलद पुनरुज्जीवन आणि भांडवली खर्च वाढवण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली आहे. तत्पूर्वी, केंद्रीय वित्त सचिव टीव्ही सोमनाथन यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते की चर्चेचे विषय राज्य पातळीवरील मुद्दे, संधी आणि आव्हाने असतील ज्याद्वारे आपण उच्च गुंतवणूक आणि वाढ साध्य करू शकतो.

Dainik Gomantak
कोरोनातून बरे झालेले रूग्ण आता करत आहेत 'या' आजाराचा सामना

गेल्या आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये कोविड-19 महामारीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेत 7.3 टक्के घसरण झाली होती. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या एप्रिल ते जून या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्था 20.1 टक्के दराने वाढली. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत 64 अब्ज डॉलरची थेट विदेशी गुंतवणूक (FDI) देशात आली आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com