बांधवगड व्याघ्र प्रकल्पात आग लावली की लागली?

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 2 एप्रिल 2021

टायगर रिझर्व मॅनेजमेंटचे म्हणणे आहे की एखाद्याने हेतूपूर्वक ही आग लावली. मगधी रेंज हे बांधवगड व्याघ्र प्रकल्पातील मुख्य क्षेत्र आहे. या घटनेनंतर वाघ व इतर वन्य प्राण्यांच्या सुरक्षेस धोका निर्माण झाला होता.

भोपाळ: मध्य प्रदेशच्या बांधवगड व्याघ्र प्रकल्पात मंगळवारी दुपारी अचानक आग लागल्याची घटना घडली. महामन आणि भद्राशीला मगधी रेंजला आग लागल्याची माहिती मिळताच बांधवगड व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाने लवकरच यावर मात करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यावेळी जाजागड, पानपाठा आणि पतौरमध्ये आग लागल्याची बातमी समोर आली आहे. मंगळवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही आग नियंत्रित करण्यात आल्याचा वाघ राखीव व्यवस्थापनाचा दावा आहे. 

दरम्यान, ही आग अनेक वाळक्या झाडामुळे बुधवारी दुपारपर्यंत धगधगत राहली. ही आग विझविण्याचा प्रयत्न परवा पर्यंत सुरू होता. टायगर रिझर्व मॅनेजमेंटचे म्हणणे आहे की एखाद्याने हेतूपूर्वक ही आग लावली. मगधी रेंज हे बांधवगड व्याघ्र प्रकल्पातील मुख्य क्षेत्र आहे. या घटनेनंतर वाघ व इतर वन्य प्राण्यांच्या सुरक्षेस धोका निर्माण झाला होता. मंगळवारी रात्री उशिरा जंगलात बांबूच्या झुडुपे जळत असताना हरण, चितळ व इतर वन्य प्राणी येथून पळत असल्याचे सांगण्यात येत आहे.

सर्वोच्च न्यायालयाने बिहार राज्य सरकारला न्यायालयाचा वेळ वाया घालविल्याबद्दल दंड ठोठावला 

बांधवगड व्याघ्र प्रकल्पात लागलेल्या आगीबाबत मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी बुधवारी सकाळी वन अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. सुमारे एक तास चाललेल्या या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी जाळपोळ होण्याच्या कारणांविषयी चर्चा केली व ते विझवण्यासाठी आवश्यक संसाधने उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. व्याघ्र प्रकल्पात आगीमुळे वन्यजीवांचे नुकसान झाले नसल्याची माहिती वन विभागाचे प्रधान सचिव अशोक बर्नवाल यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. बैठकीला वनमंत्री विजय शहा, वनसंपदा प्रमुख राजेश श्रीवास्तव आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही आग खितौली वनपरिक्षेत्रातून पसरली. तीन दिवसांपूर्वी आग विझविल्याचा दावा करण्यात आला होता पण आग पूर्णपणे विझलेली नाही. वनविभागाच्या दुर्लक्षामुळे हळूहळू ही आग इतकी भयानक पसरत गेली की, खितौली, मगधी आणि तळा या तिन्ही विभागात पसरल. यामुळे जंगलाचे बरेच नुकसान झाले. बांधवगड टायगर रिझर्व येथे भेट देणारे पर्यटक या घटनेची व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करत आहे. त्यानंतर वनविभागाच्या प्रशासनाने गांभीर्याने घेत आग आटोक्यात आणण्यासाठी त्वरित कारवाई सुरू केली.

भाजी 1 लाख रुपयाला किलो; शेतकरी मालामाल 

सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार अद्याप आगीचे कारण कळू शकले नाही पीकांचे रंक्षण करण्यासाठी  जंगलातील वन्यप्राणी पळविण्यासाठी स्थानिक लोक आपल्या शेतीभोवती छोटी स्वरूपाची आग लावतात. कारण स्थनिक शेतीचे नुकसान हत्तीसारख्या प्राण्यांमुळे होते, आणि शेतकऱ्यांनी लाक दोन लाखाचा फटका बसतो. इथले शेतकरी महुआ कापणी करतात, जे अल्कोहोल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये वापरले जाते.  प्राण्यांचा पळ काढण्यासाठी ही आग शेतीभावती लावण्यात आली होती आणि वाऱ्यामुळे ती जंगलात पसरत गेली  असल्याचे सुत्राने सांगितले आहे.
 

संबंधित बातम्या