रोहतकमध्ये बर्निंग ट्रेनचा थरार; तीन बोग्या जळून खाक!

दैनिक गोमंतक
गुरुवार, 8 एप्रिल 2021

हरियाणा मधील रोहतकमध्ये पॅसेंजर ट्रेनला आग लागली असल्याची माहिती मिळाली आहे.

हरियाणा मधील रोहतकमध्ये पॅसेंजर ट्रेनला आग लागली असल्याची माहिती मिळाली आहे. या आगीत 3 डबे जळून भस्मसात झाले आहेत. ही ट्रेन यार्ड मध्ये उभी असल्याने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे समजते. तसेच चार वाजता ही ट्रेन दिल्लीला रवाना होणार होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या आग विझवण्यासाठी पोहचल्या. मात्र आग नियंत्रित होईपर्यंत बरेच नुकसान झाले आहे. तर, आगीचे कारण शोधले जात आहे. 04453 ही ट्रेन दिल्लीहून 12 वाजता रोहतकला आली होती आणि संध्याकाळी 4 वाजता दिल्लीला जाणार होती. 

कोब्रा कमांडो दलाचे जवान राकेश्वर सिंह मनहास यांची अखेर सुटका 

मिळलेल्या माहितीनुसार दिल्लीहून आल्यानंतर ही ट्रेन काही काळ प्लॅटफॉर्मवर उभी होती. यानंतर या ट्रेनला यार्ड मध्ये पाठवण्यात आले होते आणि तेथून या ही ट्रेन 4 वाजून 5 मिनिटांनी पुन्हा दिल्लीला रवाना होणार होती. त्यानंतर दुपारी अडीचच्या सुमारास स्टेशन अधीक्षकांना रेल्वेच्या बोगीला आग लागल्याची माहिती मिळाली. एकामागून एक अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवता आले, पण तोपर्यंत तीन बोगी जळून खाक झाल्या.

ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आरटीओ कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही;वाचा नवीन...

दरम्यान, ट्रेनला आग लागली त्यावेळेस दुसर्‍या ट्रॅकवर एक इंजिनही उभे होते. या इंजिनला त्या ठिकाणाहून हलवण्यात आल्यामुळे मोठे नुकसान टळले गेले. याशिवाय यार्ड मध्ये असलेल्या ट्रेनला आग लागली असल्याने मोठे नुकसान देखील टळले असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. रेल्वे स्थानकात उभी  असताना आग लागली असती तर मोठा अपघात घडू शकला असता. यावेळी आरपीएफ आणि जीआरपीचे जवानही घटनास्थळी दाखल झाले.

संबंधित बातम्या