कोरोना रुग्णालयांतील आगीचे सत्र थांबेना; गुजरातमध्ये 18 जणांचा मृत्यू

दैनिक गोमंतक
शनिवार, 1 मे 2021

देशात सध्या कोरोना संसर्गामुळे मृत्यूचे तांडव सुरु असल्याचे पाहायला मिळते आहे. तर दुसरीकडे कोरोना रुग्णालयांमध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये देखील कोरोना रुग्णांचे बळी जात असल्याचे दिसते आहे.

देशात सध्या कोरोना संसर्गामुळे मृत्यूचे तांडव सुरु असल्याचे पाहायला मिळते आहे. तर दुसरीकडे कोरोना रुग्णालयांमध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये देखील कोरोना रुग्णांचे बळी जात असल्याचे दिसते आहे. कोरोना रुग्णालयांत होणाऱ्या दुर्घटनांचे हे सत्र काही थांबताना दिसत नाही. शुक्रवारी मध्यरात्री गुजरातच्या भरुचमधील कोरोना रुग्णालयाला लागलेल्या आगीत किमान 18 जण ठार झाले असल्याचे समजते आहे. (A fire at Corona Hospital in Bharuch, Gujarat, has killed 18 people)

मुलांमध्ये कोरोनाची सामान्य लक्षणे कशी ओळखावी?

गुजरातच्या भरूच जिल्ह्यातील वेल्फेअर कुरण रुग्णालयात शुक्रवारी मध्यरात्री आग लागली  होती. यावेळी या आगीत रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांसहित 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. रुग्णालयाच्या आयसीयू विभागात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. शुक्रवारी मध्यरात्री 12:30 वाजता आग लागली असल्याची माहिती आम्हाला मिलाली होती, अशी माहीत पोलीस अधीक्षकांनी दिली होती.  त्यानंतर ही आग विझवण्यात आली होती. देशभरातून या घटनेननंतर हळहळ व्यक्त केली जाते आहे. 

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी या घटनेबद्द्ल शोक व्यक्त केला असून, भरूच रुग्णालयात लागलेल्या आगीत प्राण गमावलेल्या रुग्ण, डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी  या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांनां राज्य सरकरकारकडून प्रत्येकी 4 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाणार असल्याचे सांगितले आहे. 

दरम्यान, रुग्णालयाच्या आयसीयू विभागात ही आग लागली त्यावेळी रुग्णालयात एकूण 70 रुग्ण उपचार घेत असल्याचे समजते आहे. रात्री आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी जाऊन आम्ही आग विझवली असल्याची माहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आली आहे. तर या घटनेनंतर इतर रुग्णांना वेगवेगळ्या रुग्णालयांत हलवण्यात आल्याचे समजते आहे.

संबंधित बातम्या