छत्तीसगडमध्ये रुग्णालयाच्या आयसीयू विभागात लागलेल्या आगीत 5 जणांचा मृत्यू

दैनिक गोमंतक
रविवार, 18 एप्रिल 2021

छत्तीसगडच्या रायपूरमध्ये रुग्णालयाला आग लागल्याची घटना समोर आली असून, या घटनेत 5 लोकांचा  मृत्यू झाल्याचे समजते आहे.

रायपुर: छत्तीसगडच्या रायपूरमध्ये रुग्णालयाला आग लागल्याची घटना समोर आली असून, या घटनेत 5 लोकांचा  मृत्यू झाल्याचे समजते आहे. या रुग्णालयात कोरोनासह इतर रुग्ण देखील होते. आगीच्या घटनेनंतर या सर्व रुग्णांना शहरातील इतर रुग्णालयांत हलवण्यात आले असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त तारकेश्वर पटेल यांनी दिली आहे.( A fire at a private hospital in Chhattisgarh has killed five people)

केंद्र सरकारचा मोठा निर्णय: रेमडेसीव्हिर इंजेक्शनच्या किंमतीत घट

छत्तीसगडची (Chattisgarh) राजधानी रायपूरमध्ये (Raipur) असणाऱ्या एका खासजी रुग्णालयाला शनिवारी आग लागल्याची घटना घडली आहे. यावेळी या रुग्णालयात कोरोना आणि इतर आजारांवर उपचार घेणारे रुग्ण होते. दवाखान्याच्या आयसीयू विभागात  झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे समजते आहे. ही आग लागली त्यावेळी रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर रुग्ण उपस्थित होते त्यामुळे दुर्दैवाने या घटनेत आता पर्यंत 5 जणांचा मृत्यू झाल्याचे समजते आहे.  राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी देखील या घटनेची दखल घेतली असून, घडलेल्या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. यावेळी भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांनी ट्विटच्या माध्यमातून "ईश्वर मृतांच्या आत्म्याला शांती देवो, तसेच आमच्या संवेदना मृतांच्या कुटुंबियांसोबत आहेत. ॐ शांति:" असे म्हणत ही घटना दुर्दैवी असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी देखील या गंभीर घंटेची दखल सोशल मीडियावरून या घटनेबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.रायपूरमध्ये खासगी रुग्णालयाच्या आयसीयू विभागात लागलेल्या आगीची घटना दुर्दैवी असून, आपल्या प्रियजनांना गमावल्यानंतर दुखी झालेल्या परिवारांसोबत आपल्या संवेदना असल्याची भावना व्यक्त केली आहे. तसेच राज्य सरकारने या कठीण प्रसंगात कुटुंबियांना मदत करण्याची विनंती देखील केली आहे. 

संबंधित बातम्या