'कोविशील्ड'चे उत्पादन करणाऱ्या पुण्याच्या सीरम इन्स्टीट्यूटला आग

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 21 जानेवारी 2021

कोरोनाविरूद्धच्या लसीचे उत्पादन करणाऱ्या पुण्याच्या सीरम इन्स्टीट्यूटला आग लागल्याची घटना घडली आहे.

पुणे : कोरोनाविरूद्धच्या लसीचे उत्पादन करणाऱ्या पुण्याच्या सीरम इन्स्टीट्यूटला आग लागल्याची घटना घडली आहे. सीरम इन्स्टीट्यूटच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली असून,रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याची बीसीजी लस ज्या ठिकाणी बनवली जाते, त्यठिकाणी ही आग लागली आहे.

 

या घटनेची माहिती मिळताच सुरुवातीला अग्निशामक दलाच्या मध्यवर्ती केंद्रतील 2 गाड्या तसेच कोंढवा व हडपसर केंद्राच्या 2 अशा चार गाड्या घटनास्थली रवाना झाल्या होत्या. त्यानंतर आतापर्यंत 10 गाड्या व एक ब्रांटो व्हेईकल अशा एकूण 11 अग्निशमन गाड्या गेल्या आहेत, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. पुणे महानगरपालिकेचे अधिकारीदेखील घटनास्थळी पोहोचले आहेत.

 

हा भाग  कोविशील्डचे उत्पादन सुरू असलेल्या ठिकाणापासून लांब आहे. त्यामुळे करोनाविरूद्धच्या लसींच्या उत्पादनाला कोणतीही हानी झालेली नसून, आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही अशी माहिती सीरम इन्स्टीट्यूटकडून देण्यात आली आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) या महिन्याच्या सुरुवातीला सीरम इन्स्टिट्यूट निर्मित ऑक्सफोर्ड कोविड - 19 कोविशील्ड लसीला आपत्कालीन मान्यता दिली आहे. 

संबंधित बातम्या