राम मंदिरासाठी निधी जमा करायला गेलेल्या व्यक्तीवर गोळीबार

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 10 फेब्रुवारी 2021

अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी निधी गोळा केला जात आहे. याच मोहिमेअंतर्गत राजस्थानमधील कोटा येथे जिल्हा संघटनेचे संचालक दीपक शाह निधी गोळा करीत होते. त्यादरम्यान मंगळवारी काही अज्ञात लोकांनी त्यांच्यावर गोळीबार केला.

राजस्थान: अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी निधी गोळा केला जात आहे. याच मोहिमेअंतर्गत राजस्थानमधील कोटा येथे जिल्हा संघटनेचे संचालक दीपक शाह निधी गोळा करीत होते. त्यादरम्यान मंगळवारी काही अज्ञात लोकांनी त्यांच्यावर गोळीबार केला. काही लोकांनी दीपक शहा यांना निधी जमा करणे बंद करण्याचा इशारा दिला होता, पण दीपक शहा यांनी हे काम थांबवले नाही.

ही घटना कोटाच्या रामगंज मंडीमधली आहे. या घटनेवरून झालावाड येथून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्याचवेळी दीपक शाहला कोटा येथील एमबीएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यादरम्यान दीपक शहाच्या पायाला एक गोळी तर दुसरी गोळी मांडीवर लागली आहे.
ही घटना रात्री उशिरा घडली. दीपक शहा यांना गोळ्या घातल्यानंतर आरोपी झालावाडच्या दिशेने पळून गेले. कोटा ग्रामीण पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्याला पकडले.

घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, राम मंदिर बांधण्यासाठी निधी गोळा करण्यासाठी जिल्हा असोसिएशनचे संचालक दीपक शहा सायंकाळी 6 ते 7 वाजता बाहेर गेले होते. दरम्यान, दुचाकीवरून तीन बदमाश आले आणि त्यांनी दीपक शहावर जोरदार गोळीबार सुरू केला. या हल्ल्यात एक गोळी दीपक शहाच्या पायाला लागली तर दुसरी गोळी मांडीला लागली. काही दिवसांपूर्वी दीपक शहा यांना हिस्ट्रीशीटरने धमकावल्याचेही पोलिसांनी सांगितले. दीपक शहा यांनी स्वत: याबाबत पोलिसांत तक्रार केली होती. 

गोव्याच्या बातम्या बाचण्यासाठी येथे क्लिक करा

या हिस्ट्रीशीटरचे नाव आशु असल्याचे सांगितले जात आहे. संध्याकाळी दीपक शहा निधी जमा करण्यासाठी बाहेर गेले असता, आशु पायाने आपल्या साथीदारांसह दीपक शहावर गोळीबार केला. सध्या दीपकची प्रकृती सामान्य आहे, बुधवारी पोलिसांनी परिसरात फ्लॅग मार्चही काढला. या घटनेपासून रामगंज मंडीमध्ये खळबळ उडाली असून घटनेचे गांभीर्य लक्षात घेता घटनास्थळी पोलिस तैनात करण्यात आले आहे. 

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कोक, पेप्सीको, बिस्लेरी कंपनीवर 72 कोटींचा दंड -

 

संबंधित बातम्या