ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरणातील पहिली अटक; बंगळुरूची पर्यावरण कार्यकर्ता दिशाला अटक

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 14 फेब्रुवारी 2021

किसान आंदोलन कथितपणे आंतरराष्ट्रीय स्तरावर घेरण्याची रणनीती उघडकीस आल्यापासून देशात बरीच खळबळ उडाली आहे. 

नवी दिल्ली :  किसान आंदोलन कथितपणे आंतरराष्ट्रीय स्तरावर घेरण्याची रणनीती उघडकीस आल्यापासून देशात बरीच खळबळ उडाली आहे. वस्तुतः पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग  हिने एक टूलकिट (दस्तऐवज) ट्वीट केलं होतं, जे नंतर डिलिट करण्यात आलं. यानंतर हे टूलकिट ट्विट करून मोदी सरकारला घेरण्याचा आणि शेतकरी आंदोलनावरून भारताची बदनामी करण्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला. या प्रकरणात आता दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या सायबर युनिटने 21 वर्षीय दिशा रवी या बंगळुरूस्थित पर्यावरण कार्यकर्तीला अटक केली आहे.

Pulwama Attack : पुलवामा दहशतवादी हल्ल्याला दोन वर्षं पूर्ण; भारताने गमावले 40 जवान

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिशा रविला आज दिल्लीच्या कोर्टात हजर केले जाईल. दिशाने 26 जानेवारीच्या ट्रॅक्टर रॅलीत सायबर स्ट्राइकसाठी डिझाइन केलेल्या टूलकिटमध्ये हदल केल्याचा आरोप होत आहे. टूलकिटमध्ये जोडल्या आणि त्याच पुढे पाठवल्या. या प्रकरणात रडारवर आणखी काही नावे आली असून लवकरच इतरांना अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. दिशा रवी फ्यूचर कॅम्पेन फॉर फ्रायडेच्या संस्थापक सदस्या आहेत. 4  फेब्रुवारी रोजी दिल्ली पोलिसांनी ग्रेटाने शेअर केलेल्या या टूलकिटसंदर्भात गुन्हा दाखल केला होता. टूल किट प्रकरणातील ही पहिली अटक आहे.

'सुब्रमण्यम स्वामी यांचा भाजपला घरचा आहेर'

दिशाने माउंट कार्मेल कॉलेजमधून व्यवसाय प्रशासनात पदवी प्राप्त केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने तिला अटक केली तेव्हा तीचे वर्क फ्रॉम होम सुरू होते.दिशा रविचे वडील मैसूरमध्ये अ‍ॅथलेटिक्स कोच आहेत तर आई गृहिणी आहेत.  4 फेब्रुवारी रोजी दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राइम सेलने मानहानी, गुन्हेगारी कट व द्वेषाला चालना देण्यासाठी भारतीय दंड संहितेच्या कलम 124 ए, 120 ए आणि 153 ए अंतर्गत एफआयआर दाखल केला होता.पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनंतर ग्रेटा थनबर्ग यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्वीट केलं होतं.

संबंधित बातम्या