राष्ट्रपती रामनाथ कोवींद यांनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 3 मार्च 2021

देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात कोरोनायोध्द्यांना लसीचा पहिला डोस देण्य़ात आला.

नवी दिल्ली : देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात कोरोनायोध्द्यांना लसीचा पहिला डोस देण्य़ात आला. सीरम इन्सिट्यूटने उत्पादीत केलेल्या ऑक्सफर्डची ''कोवीशिवल्ड'' आणि भारत बायोटेक कंपनीद्वारा बनवण्यात आलेली ''कोव्हॅक्सीन'' या दोन लसींना मान्यता देण्यात आली आहे.

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोवींद यांनी दिल्लीमध्ये कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. देशात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तिसऱ्या टप्प्यात कोरोनाची लस घेतली आहे. राष्ट्रपतींनी दिल्लीतील आर्मी हॉस्पीटल रिसर्च अ‍ॅन्ड रेफ्रल म्हणजेच आर. आर. रुग्णालयामध्ये कोरोनाची लस घेतली आहे. 

आता खासगी क्षेत्रात स्थानिकांना मिळणार 75 टक्के आरक्षण; हरियाणा सरकारचा मोठा...

तिसऱ्या टप्प्यात कोरोनाची लस 60 वर्षवरील सहव्याधी असलेल्या 45 वर्षावरील नागरिकांना सरकारी रुग्णालयामध्ये मोफत लस देण्यात येणार असल्याचं केंद्र सरकारने सांगितले आहे. देशांमध्ये 50 लाखाहून अधिक लोकांनी लसीकरणासाठी नोंदणी झाली आहे. केंद्र सरकारने तिसऱ्या टप्प्यात खासगी रुग्णालयांनाही कोरोना लस देण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र या लसीसाठी पैसे मोजावे लागणार आहे. फक्त सरकारी रुग्णालयमध्ये कोरोनाची लस मोफत देण्यात येणार आहे.

बंगाल निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला लागलं ग्रहण; पक्षांतर्गत खडाजंगी बाहेर

तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाच्या पहिल्या दिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी कोरोनाची लस घेतली आहे. नरेंद्र मोदी यांनी भारत बायोटकने बनवलेल्या कोव्हॅक्सीन या लसीचा डोस घेतला आहे. मात्र तिसरी चाचणी न झालेल्या देशी ''कोव्हॅक्सीन'' लशीच्या वापरास परवानगी दिल्याबद्दल मोदी सरकारवर टिकाही झाली होती. दिल्लीमधील राम मनोहर लोहिया रुग्णलयामधील निवासी डॉक्टरांनी कोव्हॅक्सीनबद्दल आक्षेप घेत व्यवस्थापनाला पत्र लिहिले होते.

मात्र केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले की, ''कोवीशील्ड आणि कोव्हॅक्सीन या दोन्हीही लसी सुरक्षीत असल्याचे मी पहिल्यापासून सांगत होतो. परंतु आपण आपल्या कृतीतून लोकांना उदाहरण घालून दिले पाहिजे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आम्हांला सतत सांगत असतात.आणि त्यांनी पुढे येत त्यांनी ते दाखवून दिले आहे.''  

  
 

संबंधित बातम्या