देशातील पहिलीच घटना; कोरोना लस चोरीला

दैनिक गोमंतक
बुधवार, 14 एप्रिल 2021

रुग्णालयाच्या वतीने शास्त्रीनगर पोलिस ठाण्यात लस चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजस्थानमध्ये कोरोना लसीचा तुटवडा असताना सरकारी रूग्णालयातून लस चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. जयपूर शहरातील शास्त्री येथे असलेल्या कवंतिया हॉस्पिटलमधून कोवाक्सिन लसीचे एकूण 320 डोस चोरीला गेले आहेत. रुग्णालयाच्या वतीने शास्त्रीनगर पोलिस ठाण्यात लस चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहितीनुसार 12 एप्रिल रोजी या लसी हरवल्या होत्या. दोन दिवसांनंतर आज सकाळी एक अहवाल दाखल करण्यात आला आहे. सीएमएचओ कार्यालयातून भारत बायोटेकने बनवलेल्या कोवाक्सिनच्या ३२० लसी हरवल्या आहेत असे या अहवालात नमूद केले आहे . लस केंद्राकडे आली असल्याची संपूर्ण नोंद आहे असे लसीकरण केंद्राचे नोडल अधिकाऱ्यांनी संगीतले. (The first incident in the country was the theft of the corona vaccine)

परदेशी लसीच्या आयातीवरून राहुल गांधींची केंद्र सरकारवर टीका

पोलिसांना तपासासाठी गेले असता सीसीटीव्ही बंद
रुग्णालय व्यवस्थापनाकडून मिळालेल्या तक्रारीनंतर  पोलिस घटनास्थळी गेले. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेर्‍याची तपासणी केली असता, लसीकरण स्टोअरच्या आसपासचे सर्व कॅमेरे बंद असल्याचे या प्रकरणाचा तपास करीत असलेले शास्त्री नगरचे पोलीस अधिकरी दिलीप सिंह म्हणाले. 

कागदावर लसीचा साठा योग्य आहे, परंतु प्रत्यक्षात नाही
लस चोरीच्या प्रकरणात रूग्णालयाच्या अधीक्षकांनी आपल्या स्तरावरही तपासणी केली आहे. लसीकरण कक्षातूनच ही लस गायब झाल्याचे तपासात समोर आले आहे. रुग्णालयातील लसी या केंद्रातून इतर केंद्रांवरही पाठविली जाते, त्याची संपूर्ण नोंद ठेवली जाते. तपासणीत असे दिसून आले आहे स्टोअरमधील लसींच्या यादी कागदावरती आहे, परंतु ही लस साठ्यात नाही. राजस्थानमध्ये लसीची कमतरता आहे. बुधवारी सकाळपर्यंत राज्यात सुमारे 4 लाख डोस उपलब्ध होते. तथापि, संध्याकाळी उशिरापर्यंत 2 लाख डोस येणे अपेक्षित आहे. राज्याचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनीही लस नसल्याबाबत पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे.
 

संबंधित बातम्या