
First look New Parliament Video: पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 मे रोजी संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. PM मोदी दुपारी 12 वाजता संसदेचे उद्घाटन करणार आहेत, मात्र त्याआधी सकाळी 7 वाजल्यापासून हवन पूजनाचा कार्यक्रम सुरू होईल.
दरम्यान, नवी संसद कशी आहे याचा व्हिडिओ समोर आला आहे. ANI च्या वतीने हा व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे.
नवीन संसदेचे बांधकाम 64,500 चौरस मीटर परिसरात पसरले आहे. याचे क्षेत्रफळ विद्यमान संसदेच्या इमारतीपेक्षा 17,000 चौरस मीटर अधिक आहे.
संसदेतील लोकसभेची इमारत राष्ट्रीय पक्षी मोराच्या थीमवर तर राज्यसभेची रचना राष्ट्रीय फूल कमळाच्या थीमवर निर्माण करण्यात आली आहे. जुन्या लोकसभेत जास्तीत जास्त 552 सदस्य बसू शकतात. नवीन लोकसभेच्या इमारतीची क्षमता 888 आसनांची आहे.
तर, जुन्या राज्यसभेच्या इमारतीत 250 सदस्यांची आसनक्षमता आहे, तर नवीन राज्यसभा सभागृहाची क्षमता 384 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
दरम्यान, संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाबाबत विरोधकांकडून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. नवीन संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते व्हावे, अशी विरोधकांची मागणी आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी होणाऱ्या नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभाला 18 NDA घटकपक्ष आणि 7 गैर NDA पक्षांसह किमान 25 पक्ष उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर 21 विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.