आर्मी कमांडर परिषदेचा पहिला टप्पा दिनांक 27 मे ते 29मे दरम्यान

Pib
बुधवार, 27 मे 2020

साउथ ब्लॉकमध्ये होणाऱ्या पहिल्या टप्प्यांतर्गत लॉजिस्टिक्स आणि मनुष्यबळाशी संबंधित अभ्यासासह परिचालन आणि प्रशासकीय मुद्द्यांच्या विविध पैलूंवर चर्चा होईल. 

मुंबई, 

आर्मी कमांडर परिषद उच्च स्तरीय द्वैवार्षिक कार्यक्रम असून या परिषदेमध्ये महत्त्वाच्या धोरणात्मक निर्णयांना पोषक ठरणाऱ्या संकल्पनांवर चर्चा करण्यात येते. एप्रिल 2020 मध्ये होणारी ही परिषद कोविड-19 महामारीमुळे पुढे ढकलण्यात आली होती. आता दोन टप्प्यांमध्ये या परिषदेचे आयोजन होणार असून 27 ते 29 मे दरम्यान या परिषदेच्या पहिल्या टप्प्याचे आयोजन होईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील परिषद जून 2020च्या शेवटच्या आठवड्यात आयोजित करण्यात येईल.

भारतीय लष्करासमोर सध्या निर्माण होणाऱ्या सुरक्षाविषयक स्थितीबाबत आणि प्रशासकीय  आव्हानांबाबत तसेच लष्कराच्या भावी वाटचालीची दिशा निश्चित करण्याबाबत लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे या परिषदेत व्यापक विचारमंथन होईल. अतिशय उच्च दर्जा आणि अचूकतेसाठी  लष्कराचे कमांडर आणि वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश असलेल्या कॉलेजियेट प्रणालीच्या माध्यमातून निर्णय घेतले जातात. साउथ ब्लॉकमध्ये होणाऱ्या पहिल्या टप्प्यांतर्गत लॉजिस्टिक्स आणि मनुष्यबळाशी संबंधित अभ्यासासह परिचालन आणि प्रशासकीय मुद्द्यांच्या विविध पैलूंवर चर्चा होईल. 

संबंधित बातम्या