पिनाराई विजयन यांच्या  76 व्या वाढदिवशी केरळ विधानसभेचे पहिले सत्र आजपासून सुरू 

दैनिक गोमंतक
सोमवार, 24 मे 2021

केरळच्या 15 व्या विधानसभेचे (Kerala Legislative Assembly) पहिले अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. विधानसभेच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री  पिनाराई  विजयन ( Chief Minishter Pinarayi Vijayan)  आणि त्यांच्यासमवेत अन्य नवनिर्वाचित आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली.

केरळच्या 15 व्या विधानसभेचे (Kerala Legislative Assembly) पहिले अधिवेशन (Convention)  आजपासून सुरू झाले आहे. विधानसभेच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री  पिनाराई  विजयन ( Chief Minishter Pinarayi Vijayan)  आणि त्यांच्यासमवेत अन्य नवनिर्वाचित आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली. केरळमधील कुन्नमंगलमचे आमदार प्रोटेम स्पीकर पी. टी. ए रहीम यांनी सर्वांना पदाची शपथ दिली. 20 मे रोजीच पिनाराई विजयन यांनी केरळच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. केरळमध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर चार दिवसानंतर विधानसभेचे पहिले अधिवेशन आजपासून सुरू झाले.  कोविड 19  प्रतिबंधक नियमावलीचे पालन करत या अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली.  (The first session of the Kerala Legislative Assembly begins today on the 76th birthday of Pinarayi Vijayan) 

बिहार: ऐन कोरोना काळात आरोग्य केंद्राची केली गोशाळा

कोविड 19  साथीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अधिवेशनासाठी अनेक विशेष व्यवस्था करण्यात आल्या आहेत.  सकाळी नऊ वाजता सभागृहाचे कामकाज सुरू झाले आणि त्यानंतर निवड झालेल्या 140 सदस्यांना पदाची शपथ देण्यात आली.   पी. टी. ए रहीम यांनी  रहीम यांनी सर्व सदस्यांना शपथ दिली. तर अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी विधानसभेच्या नवीन सभापतीची निवड करण्यात येणार आहे. 

6 एप्रिल 2021 रोजी केरळमधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले आणि 2 मे रोजी निकाल लागला. केरळ निवडणुकीत डाव्या लोकशाही आघाडीला (एलडीएफ) बहुमत मिळाले. तर  यानंतर, 77 वर्षीय पिनराई विजयन यांनी 20 मे रोजी केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्याकडून सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.  आपला कार्यकाळ पूर्ण करून इतिहास रचणार्‍या केरळचे पहिले मुख्यमंत्री पिनाराई  विजयन  यांचा आज 76 वा वाढदिवस आहे.  विशेष म्हणजे पिनाराई विजायन यांच्या वाढदिवाशीच 15 व्या केरळ विधानसभेच्या अधिवेशनाच्या आज पहिलाच दिवस आहे. मात्र आज कोणताही कार्यक्रम किंवा समारंभ होणार नसल्याचे पिनाराई यांनी जाहीर केले आहे. 

कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (Marxist) चे  सदस्य पिनाराई  यांचा जन्म कन्नूरमधील एका गरीब कुटुंबात झाला. पिनाराई यांचे प्राथमिक शिक्षण पर्लासरी हायस्कूल व  महाविद्यालयीन शिक्षण  ब्रेनन कॉलेजमधून झाले. महाविद्यालयीन जीवणातच त्यांनी त्यांनी विद्यार्थी संघटनांच्या माध्यमातून राजकीय वाटचालीला सुरुवात केली.  1964 मध्ये त्यांनी औपचारिकरित्या भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) मध्ये प्रवेश केला आणि येथून सक्रिय राजकारणामध्ये त्यांचा प्रवास सुरू झाला.

गेल्या पाच वर्षांपासून केरळमधील लोक जेव्हा संकटात होते तेव्हा लोकांनी आघाडीच्या सरकारला सातत्य दिले. केंद्रीय एजन्सींकडून आरोप आणि चौकशीच्या वादळातही पिनाराई  विजयन यांनी हार मानली नाही. वयाच्या 76 व्या वर्षी काही निवडक  उमेदवारांसह त्यांनी मुख्यमंत्री पद मिळवले. पिनाराई विजयन  पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले तेव्हा एलडीएफने 91 जागा जिंकल्या, यावेळी त्यात वाढ झाली असून आटाटि 99 वर पोहचली आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर पिनाराई यांनी विविध कल्याणकारी योजना राबवून लोकांची मने जिंकली.  आपल्या दुसऱ्या इनिंगमध्ये ते पुन्हा एकदा नवीन इतिहास  लिहिण्यास तयार झाले आहे. 
 

संबंधित बातम्या