''सचिन वाझे प्रकरणाचा राज्यातील सरकारवर परिणाम होणार नाही''

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 16 मार्च 2021

महाराष्ट्रातील सचिन वाझे प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा या सचिन वाझे प्रकरणावर काम करत असताना आपण याबद्दल टिप्पणी करणे योग्य नसल्याचे मत शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केले.

महाराष्ट्रातील सचिन वाझे प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा या सचिन वाझे प्रकरणावर काम करत असताना आपण याबद्दल टिप्पणी करणे योग्य नसल्याचे मत शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केले. शिवाय या प्रकरणात जर कोणी आपल्या अधिकाराचा गैरवापर केला असेल तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे शरद पवार यावेळी म्हणाले. आणि या प्रकरणावरून महाराष्ट्रातील  महाविकास आघाडी सरकारवर कोणताही परिणाम होणार नसल्याची पुस्ती शरद पवार यांनी जोडली. 

पंतप्रधानांचे मुख्य़ सल्लागार पी. के. सिन्हा यांचा राजीनामा

याशिवाय, महाराष्ट्राचे गृह मंत्री अनिल देशमुख यांच्यावर होत असलेल्या टीकेबाबत बोलताना, गृहखात्याने योग्य ती कारवाई केल्यामुळेच संबंधित आरोपी समोर आल्याची माहिती शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर शरद पवारांनी उत्तर देण्याचे टाळत, हा प्रश्न राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विचारण्याचे शरद पवार म्हणाले. तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत या प्रकरणावर कोणतीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट करत, राज्यातील समस्या आणि त्या समस्यांवर केंद्र सरकारकडून काही मदत मिळवता येईल का? याबाबत बोलणे झाल्याचे शरद पवारांनी यावेळी स्पष्ट केले.            

त्यानंतर, केरळचे काँग्रेस नेते पी.सी.चाको यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रफुल्ल पटेल आणि खासदार श्रीनिवास पाटील यांच्या उपस्थितीतआज राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. यावेळी काँग्रेस सोबतच्या संबंधांबद्दल पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना शरद पवार यांनी, वेगवेगळ्या राज्यात नेहमीच स्थानिक परिस्थिती नुसार भूमिका घेतली असल्याचे सांगितले. शिवाय ज्या ठिकाणी सामना भाजप सोबत असतो त्यावेळी आपला पक्ष हा काँग्रेस सोबत असल्याचे ते म्हणाले. व पुढे त्यामुळे पी.सी.चाको यांच्या पक्ष प्रवेशाचा काँग्रेस सोबतच्या संबंधांवर कुठलाही परिणाम होणार नसल्याची माहिती शरद पवारांनी दिली. आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल, साताऱ्याचे खासदार आणि शरद पवारांचे निकटवर्तीय श्रीनिवास पाटील, आणि नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केलेले पी.सी.चाको व आमदार निलेश लंके यावेळी उपस्थित होते.

जखमी वाघीण घातक ठरेल असे म्हणत ममता बॅनर्जींचा भाजपवर जोरदार हल्लाबोल

दरम्यान, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या मोटारीच्या चौकशीच्या संदर्भात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एनआयए) मुंबई पोलिस दलातील अधिकारी सचिन वाझे यांना ताब्यात घेतले होते. व त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने सचिन वाझे यांना  25 मार्च पर्यंत एनआयए कोठडीत रवानगी केली आहे. तर गेल्या महिन्यात 25 फेब्रुवारी रोजी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ एक स्फोटकांनी भरलेली संशयास्पद स्कॉर्पिओ कार सापडली होती. आणि या घटनेच्या एका आठवड्यानंतर स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे हे मागील चार महिन्यांपासून ही गाडी चालवत होते. व मुकेश अंबानी यांच्या घराजवळ ही कार आढळून आल्यानंतर देखील सचिन वाझे हे मनसुख हिरेन यांच्या संपर्कात असल्याची माहिती पुढे आली होती.  
 

संबंधित बातम्या