पाचव्या पिढीतील मोबाईलच्या ‘फाइव्ह-जी’चे नेटवर्क लागले वेध

दैनिक गोमन्तक
बुधवार, 9 डिसेंबर 2020

पुढील वर्षीच्या मध्यावधीपर्यंत देशामध्ये फाइव्ह-जी दूरसंचार सेवा सुरु करण्यात येईल, असे सूतोवाच उद्योगपती मुकेश अंबानी यांनी आज केले.

नवी दिल्ली : पुढील वर्षीच्या मध्यावधीपर्यंत देशामध्ये फाइव्ह-जी दूरसंचार सेवा सुरु करण्यात येईल, असे सूतोवाच उद्योगपती मुकेश अंबानी यांनी आज केले. सर्वांना सर्वत्र परवडेल अशा दरामध्ये हे नेटवर्क उपलब्ध करून देण्यासाठी काही धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील, असेही त्यांनी सांगितले.

 
देशातच हार्डवेअर निर्मितीवर भर देताना अंबानी यांनी या क्षेत्रामध्ये आपल्याला फारकाळ परदेशावर अवलंबून राहता येणार नाही, असे म्हटले आहे. ते इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये बोलत होते. फाइव्ह-जी हे पाचव्या पिढीतील मोबाईल नेटवर्क असून त्यामुळे प्रत्येकजण परस्पराशी व्हर्च्युअली जोडल्या जाणार आहे. मशीन, ऑबजेक्ट आणि डिव्हायसेस परस्परांशी जोडल्या जाईल.

उत्तम संगणकीय नेटवर्क असणाऱ्या देशांत भारताचा समावेश होतो, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून इंडिया मोबाईल काँग्रेसला मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, मोबाईल निर्मितीच्या क्षेत्रामध्ये भारत आघाडीचा देश म्हणून उदयाला येईल. मोबाईलचे दर खूप कमी आहेत पण आमचे ॲप मार्केट मात्र वेगाने वाढणारे आहे असे त्यांनी नमूद केले. 

आणखी वाचा:

संबंधित बातम्या