नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत पाच जवान शहीद

नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत पाच जवान शहीद
Five jawans martyred in clashes with Naxals

छत्तीसगढमधील बिजापूरच्या तारेम जवळच्या जंगलात नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीमध्ये पाच जवान शहीद झाले असून दहा जवान जखमी झाल्याची माहीती समोर आली आहे. छत्तीसगढचे डीजीपी डीएम अवस्थी यांनी यासंबंधी माहीती दिली आहे. शहीद झालेल्या जवानांमध्ये डीआरजी आणि सीआरपीफच्या जवानांचा समावेश होतो.

याआधीही छत्तीसगढमधील नारायणपूर जिल्ह्यात मंगळवारी नक्षलवाद्यांनी घडविलेल्या भूसुरुंग स्फोटात पाच पोलीस शहीद झाले आहेत. तर 14 जण जखमी झाले.

जिल्हा राखीव पोलीस दलामधील 20 कर्मचारी मंगळवारी नक्षलवाद्यांच्याविरोधातील मोहीम संपवून एका खास बसद्वारे नारायणपूरकडे निघाले होते. कदेनार आणि कान्हारगाव दरम्यान नक्षलवाद्यांनी भूसुरुंगा स्फोटाद्वारे पोलिसांची बस उडवून दिली. त्यामध्य़े चालकाबरोबर पाच पोलिस शहीद झाले, अशी माहीती पोलिस महानिरिक्षक पी. सुंदरराज यांनी दिली. 


 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com