सीरम इन्सिट्यूटच्या आगीत पाच जणांचा मृत्यू

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 21 जानेवारी 2021

कोरोनाची लस तयार होत असलेल्या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आज भीषण आग लागली होती. या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाची लस तयार होत असलेल्या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आज भीषण आग लागली होती. या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी याबाबतची माहिती दिली. आगीत मृत्यू झालेले लोक हे बांधकाम मजूर असल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात येत आहे. दुपारी सव्वा दोन वाजताच्या सुमारास ही आग लागली होती. व त्यानंतर सुमारे चार तासांच्या अथक परिश्रमानंतर ही आग नियंत्रणात आणण्यात यश आले. मात्र या दुर्देवी घटनेत पाच जणांचा मृत्यू झालेला आहे. 

सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर आग लागली होती. काही वेळाने ही आग वाढत जाऊन तिसऱ्या व चौथ्या मजल्यापर्यंत पोहचली होती. त्यानंतर बीसीजी लसीचे उत्पादन सुरु असलेल्या इमारतीला आग लागल्याचे सीरम इन्स्टिट्यूटने सांगितले होते. आगीची तात्काळ माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या मध्यवर्ती केंद्रतील 11 गाड्या या ठिकाणी पाठवण्यात आल्या होत्या. व त्यांनी ही आग आटोक्यात आणली. मात्र त्यानंतर या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेवर सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पुनावाला यांनी दुःख व्यक्त केले आहे.  

कोरोना विरुद्धची कोविशिल्ड ही लस सीरम इन्स्टिट्यूट मध्ये तयार करण्यात येत आहे. मात्र कोविशिल्ड लस तयार करण्यात येत असलेल्या ठिकाणी आगीची झळ बसली नसल्याचे सीरम इन्स्टिट्यूटने सांगितले. परंतु या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून, यानंतर सीरमचे प्रमुख आदर पुनावाला यांनी सोशल मीडियावरील ट्विटरवर मृत पावलेल्या कुटंबीयांच्या सोबत असल्याचे म्हणत संवेदना व्यक्त केल्या आहेत. याशिवाय या घटनेमुळे दुःखी झाल्याचे देखील आदर पुनावाला यांनी म्हटले आहे.         

संबंधित बातम्या