शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने झालेल्या चकमकीत पाकिस्तानचे पाच सैनिक ठार

PTI
शनिवार, 12 डिसेंबर 2020

 पूंच सेक्टरमध्ये पाकिस्तानने कालपासून काल सकाळपर्यंत गोळीबार करत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. या गोळीबाराला भारताने चोख उत्तर दिल्याने पाकिस्तानचे पाच सैनिक मारले गेले.

जम्मू :   पूंच सेक्टरमध्ये पाकिस्तानने कालपासून काल सकाळपर्यंत गोळीबार करत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. या गोळीबाराला भारताने चोख उत्तर दिल्याने पाकिस्तानचे पाच सैनिक मारले गेले. पाकिस्तानने तीन ते चार आघाडीच्या चौक्यांतून गोळीबार केल्याचे लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले. या गोळीबारात पाकिस्तानचे तीन सैनिक जखमी झाल्याचे सूत्राने सांगितले. पाकिस्तानकडून गुरुवार दुपारपासून गोळीबाराला सुरवात झाली. उखळी तोफांचा मारा करत भारतीय चौक्या आणि नागरी वस्तींना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भारताने चोख उत्तर दिले. त्यात पाकिस्तानच्या विविध चौक्यांवरील पाच सैनिक ठार झाले.

 

काही दिवसांपासून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील काही भागात पाकिस्तानकडून सातत्याने गोळीबार केला जात असल्याने परिसरात अशांतता निर्माण झाली आहे. कालच्या गोळीबारात पाकिस्तानने पूंच सेक्टरला अधिक लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. विशेषत: मानकोटे भागात सर्वाधिक गोळीबार झाला. त्यामुळे सीमाभागातील काही घरांचे नुकसान झाले आहे. भारताच्या गोळीबारात पाकिस्तानचे पाच सैनिक मारले गेले तर तीन जण जखमी झाले. पाकिस्तानने सीमाभागात अनेक नवीन खंदक तयार केले असून ते भारतीय जवानांनी उद्‍ध्वस्त केले. ३२०० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन १९९९ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधीचा करार झाला आहे. तरीही पाकिस्तानकडून नेहमीच या कराराचे उल्लंघन होत आहे. दहशतवाद्यांना घुसखोरीसाठी वाव मिळावा यासाठी पाकिस्तानकडून सीमाभागात कुरापती केल्या जातात. 

 

 

 

संबंधित बातम्या