आसाममध्ये पुरामुळे 25 जणांचा मृत्यू ; 8 लोक बेपत्ता

अधिकाऱ्याने सांगितले की, पूरग्रस्तांसाठी अन्न आणि इतर आवश्यक वस्तूंची व्यवस्था आधीच करण्यात आली आहे.
आसाममध्ये पुरामुळे 25 जणांचा मृत्यू ; 8 लोक बेपत्ता
Flood in Assam Dainik Gomantak

आसाममधील पूरस्थिती चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे. पुराने चार मुलांसह आणखी आठ जणांचा बळी घेतला आहे. पुरातील मृतांची संख्या 25 वर पोहोचली आहे. या वर्षी राज्यातील पूर आणि भूस्खलनात एकूण मृतांची संख्या 62 वर गेली आहे.

Flood in Assam
Agnipath: राजस्थानसह या राज्यांनी केंद्राला केले आवाहन, 'तात्काळ योजना मागे घ्या'

दुसरीकडे, इतर आठ जण बेपत्ता आहेत. होजई जिल्ह्यातून चार जण बेपत्ता आहेत तर इतर चार जण बजली, कार्बी आंगलाँग पश्चिम, कोक्राझार आणि तामुलपूर जिल्ह्यातून बेपत्ता आहेत. दुसरीकडे, राज्यातील 32 जिल्ह्यांमध्ये सुमारे 31 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्यांच्या पुराचे पाणी 4,291 गावांमध्ये शिरले असून 66455.82 हेक्टर पीक जमीन पाण्याखाली गेली आहे.

बारपेटा येथील जिल्हा प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, येथील ग्रामस्थ त्यांच्या घरात अनेक मौल्यवान वस्तू असल्याचे सांगून घरे सोडण्यास तयार नव्हते, मात्र आम्ही त्यांना घरे खाली करण्यास राजी केले आणि आता त्यांची व्यवस्था केली जात आहे.

Flood in Assam
'अग्निपथ' वर कोण बनणार 'माफीवीर', विरोधकांच्या रडारावर मोदी-शहा

येत्या काही दिवसांत परिस्थिती आणखी बिघडू शकते
अधिकाऱ्याने सांगितले की, पूरग्रस्तांसाठी अन्न आणि इतर आवश्यक वस्तूंची व्यवस्था आधीच करण्यात आली आहे. नजीकच्या भूतानमध्ये पाण्याची पातळी वाढत आहे, त्यामुळे आपल्या जिल्ह्यालाही याचा फटका बसत असून येत्या काही दिवसांत परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते.

मदत आणि बचाव कार्यात बचाव पथके लष्करासोबत गुंतलेली आहेत
दुसरीकडे, भारतीय लष्कर, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, आसाम पोलिसांच्या अग्निशमन आणि आपत्कालीन सेवांसह निमलष्करी दलांनी 24×7 बचाव आणि मदत सुरू केली आहे. पुराचा शेकडो घरांवर वाईट परिणाम झाला आहे आणि अनेक रस्ते, पूल आणि कालवे यांचे नुकसान झाले आहे, तसेच अनेक बंधारे तुटले आहेत. ब्रह्मपुत्रा, बेकी, मानस, पगलाडिया, पुथिमारी, कोपिली आणि जिया-भराली नद्या अनेक ठिकाणी धोक्याच्या चिन्हावरून वाहत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com