आंध्र पाठोपाठ तमिळनाडूतही ऑनलाइन गेमिंगवर बंदी

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

आंध्र प्रदेशपाठोपाठ आता तमिळनाडूने देखील राज्यात ऑनलाइन गेमिंगवर बंदी घातली आहे. राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी यासंदर्भातील अध्यादेश जारी केला. नियमांचे उल्लंघन केल्यास शिक्षेची तरतूद अध्यादेशात केली आहे. 

चेन्नई : आंध्र प्रदेशपाठोपाठ आता तमिळनाडूने देखील राज्यात ऑनलाइन गेमिंगवर बंदी घातली आहे. राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी यासंदर्भातील अध्यादेश जारी केला. नियमांचे उल्लंघन केल्यास शिक्षेची तरतूद अध्यादेशात केली आहे. 

ऑनलाइन गेमिंगमुळे युवकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. एवढेच नाही तर या खेळात पैसे गमावल्यावर काही जण आत्महत्येचा मार्ग स्वीकारत असल्याचे अध्यादेशात म्हटले आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी आणि जनतेच्या सुरक्षेसाठी सरकारने सध्याच्या कायद्यात सुधारणा करत ऑनलाइन खेळावर बंदी घालण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. त्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. या अध्यादेशात तीन कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे. सुधारित कायद्यानुसार राज्यात बेटिंगवरही बंदी घातली गेली आहे. 

अधिक वाचा :

मसुरीतील ३९ ट्रेनी अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण

दिल्लीकरांना यंदा नोव्हेंबरमध्येच हुडहुडी

भाजपचा मोर्चा आता तमिळनाडूकडे..! 

संबंधित बातम्या