चीनशी चर्चा निष्फळ ठरल्यास लष्करी पर्याय खुला: सरसेनाध्यक्ष बिपीन रावत

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 25 ऑगस्ट 2020

राजनैतिक पातळीवरूनही चर्चा सुरु आहे. त्यामुळे भारताकडे लष्करी पर्यायही खुला आहे, मात्र चर्चा अपयशी ठरली तरच तो वापरला जाईल, असे रावत यांनी सांगितले.

नवी दिल्ली: सैन्याच्या घुसखोरीच्या मुद्यावरून भारत आणि चीनदरम्यान सुरु असलेली लष्करी आणि राजनैतिक पातळीवरील चर्चा अपयशी ठरल्यास भारताकडे ‘लष्करी पर्याय’ उपलब्ध आहे, असा इशारा सरसेनाध्यक्ष जनरल बिपीन रावत यांनी दिला आहे. 

लडाख भागातील घुसखोरीवरुन गेल्या चार महिन्यांपासून चीनबरोबर वाद सुरु असून तो मिटविण्यासाठी लष्करी पातळीवरील चर्चेच्या फेऱ्याही झाल्या आहेत. राजनैतिक पातळीवरूनही चर्चा सुरु आहे. त्यामुळे भारताकडे लष्करी पर्यायही खुला आहे, मात्र चर्चा अपयशी ठरली तरच तो वापरला जाईल, असे रावत यांनी सांगितले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या