उत्तर प्रदेशात बळजबरीने धर्मांतर केल्यास तुरुंगाची हवा

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 26 नोव्हेंबर 2020

राज्यात बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराला रोखण्यासाठी योगी आदित्यनाथ सरकारने अध्यादेश आणला असून त्यास उत्तर प्रदेश मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.

लखनौ  : राज्यात बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराला रोखण्यासाठी योगी आदित्यनाथ सरकारने अध्यादेश आणला असून त्यास उत्तर प्रदेश मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. याप्रमाणे धर्मांतर प्रतिबंध कायदा राज्यात लागू झाला असून कायदा मोडणाऱ्यास किमान एक वर्ष ते दहा वर्षाची कैद आणि दंडही भरावा लागणार आहे. धर्म लपवून किंवा जबरदस्तीने धर्मांतर करून होणाऱ्या विवाहांना रोखण्यासाठी योगी सरकारने धर्मांतर बंदी अध्यादेशाच्या मसुद्यास मंजुरी दिली आहे.

खोटे-नाटे बोलून फसवणूक करत धर्मांतर करणाऱ्या लोकांना योगी सरकारकडून कडक कारवाई केली जाणार आहे. राज्यपालांची मंजुरी मिळताच कायदा लागू होणार असून हा गुन्हा अजामीनपात्र आहे. या अध्यादेशातील प्रमुख तरतुदींमध्ये, कायदा मोडल्यास दहा वर्षांपर्यंत कैद भोगावी लागेल, धर्मांतर हे स्वच्छेने असल्याचे सिद्ध करावे लागेल, धर्मांतराची सूचना दोन महिने अगोदर जिल्हा दंडाधिकाऱ्यास द्यावी लागेल.

अधिक वाचा :

बिहार विधानसभा अध्यक्षपदी ‘एनडीए’चे विजय कुमार सिन्हा

बिहारमध्ये ‘एनडीए’च्या आमदारांना लालूंचे मंत्रिपदाचे आमिष 

चेन्नईत पावसाचा धुमाकूळ ; आज सार्वजनिक वाहतूकीवर बंदी 

संबंधित बातम्या