देशाचे माजी अ‍ॅटर्नी जनरल सोली सोराबजी यांचे कोरोनाने निधन

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 30 एप्रिल 2021

देशाचे माजी अ‍ॅटर्नी जनरल सोली सोराबजी यांचे कोरोनाने निधन झाले. ते 91 वर्षांचे होते.  सोली सोरबजी यांची देशातील सर्वात मोठे  मानवाधिकार वकील म्हणून ओळख आहे.

नवी दिल्ली :  देशाचे माजी अ‍ॅटर्नी जनरल सोली सोराबजी यांचे कोरोनाने निधन झाले. ते 91 वर्षांचे होते.  सोली सोरबजी यांची देशातील सर्वात मोठे  मानवाधिकार वकील म्हणून ओळख आहे.  मानवी हक्कांच्या परिस्थितीबद्दल जाणून घेण्यासाठी 1997 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी सोली सोराबाजी यांना नायजेरियात विशेष दूत म्हणून पाठविले होते. तेथील त्यानंतर 1998 ते 2004 या काळात ते  मानवाधिकार प्रोत्साहन व संरक्षण या विषयावर यूएन-सब कमिशनचे सदस्य आणि नंतर अध्यक्ष पदावर कार्यरत होते. (Former Attorney General Soli Sorabjee dies in Corona) 

डॉक्टरांना शिव्या-शाप देण्यापूर्वी घामाने थिजलेल्या 'या' कोरोना...

सोली सोरोबाजींचा यांचा जन्म 1930 मध्ये महाराष्ट्राची राजधानी मुंबई याठिकाणी  झाला.  ते 1953 पासून मुंबई उच्च न्यायालयात सराव करीत होते. 1971 मध्ये सोली सोराबजी सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील झाले.  तर सोली सोराबजी  1989 ते 1990 आणि त्यानंतर 1998 ते 2004 या काळात अ‍ॅटर्नी जनरल पदावर कार्यरत होते.  राम जेठमलानी देशाचे कायदे मंत्री असताना सोली सोरबजी अ‍ॅटर्नी जनरल पदावर होते.

सोली सोराबजी हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उत्तम वकील होते. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात भारतीय इतिहासातील अनेक ऐतिहासिक प्रकरणांमध्ये पत्रकारांच्या स्वातंत्र्याचा बचाव केला. इतकेच नव्हे  तर सेन्सॉरशिपचे आदेश आणि प्रकाशनांवरील निर्बंध दूर करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. मार्च 2002 मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार, दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आले. 

मात्र काही कायदेशीर मुद्द्यांवरून राम जेठमलानी आणि तत्कालीन सरन्यायाधीश ए.एस. आनंद यांच्यात संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली. हे प्रकरण इतके वाढले की न्यायपालिका आणि कार्यकारिणी यांच्यात संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली. हा संघर्ष टाळण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान अटल जी यांनी जसवंत सिंग यांना बोलावून जेठमलानी यांच्या राजीनाम्याची मागणी केली. जेठमलानी यांनीही तातडीने राजीनामा दिला. 
 

संबंधित बातम्या