कोरोनामुळे सीबीआयचे माजी संचालक रणजीत सिन्हा यांचे निधन

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 16 एप्रिल 2021

 गुरुवारी रात्री सिन्हा यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

देशात कोरोनाचा उद्रेक पुन्हा एकदा वाढू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर सीबीआयचे माजी संचालक रणजीत सिन्हा यांचे कोरोनामुळे निधन झालं आहे. दिल्लीत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 68 वर्षाचे होते. गुरुवारी रात्री सिन्हा यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. रणजीत सिन्हा बिहार कॅडरचे 1974 सालच्या बॅचचे आयपीएस ऑफिसर होते. 2012 ते 2014 कालावधीमध्ये सीबीआयच्या संचालकपदी होते. सीबीआय संचालकपदी नियुक्ती होण्यापूर्वी सिन्हा रेल्वे सुरक्षा दलाचे नेतृत्व करत होते.

याशिवाय त्यांनी दिल्ली आणि पटणामध्ये सीबीआयच्या वरिष्ठ पदावरही होते. सीबीआय प्रमुख असताना सिन्हा अनेक वादामध्ये अडकले होते. इशरत जहा चकमक प्रकरणावरुन त्यांचा गुप्तचर विभागाशी वाददेखील झाला होता. (Former CBI Director Ranjit Sinha dies due to corona)

देशात एक पर्यटक नेता आहे' म्हणत अमित शहांचा राहुल गांधींवर निशाणा

2014 मध्ये रणजीत सिन्हा यांच्या पत्नीने पाटणामधून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर सिन्हा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले होते. कोळसा खाण घोटळा प्रकरणाच्या तपासामध्ये ते मध्यस्थी करत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्याचबरोबर 2 जी घोटाळ्यातील आरोपी किंवा कंपन्यांचे प्रतिनिधी अनेकदा त्यांच्या निवासस्थानी गेल्याचं समोर आलं होतं.

 

संबंधित बातम्या