"जवान शहीद होत असताना मुख्यमंत्री भूपेश बघेल प्रचारात व्यस्त होते"

दैनिक गोमंतक
सोमवार, 5 एप्रिल 2021

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंग यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर आरोप केले आहेत. 

शनिवारी छत्तीसगडमध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 22 जवान शहीद झाले असून, 32 जवान जखमी झाले आहेत. केंद्रीय पातळीवर या घटनेची दाखल घेतली गेली असून गृहमंत्री अमित शाह स्वतः आज घटनास्थळी पोहोचणार असल्याचे समजते आहे. त्यातच आता छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री   रमण सिंग यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर आरोप केले आहेत. (Former Chhattisgarh Chief Minister Raman Singh has leveled allegations against Chief Minister Bhupesh Baghel.)

Chattisgarh Naxal Attack: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह घटनास्थळी भेट देणार;...

छत्तीसगडच्या बीजापूर गावाजवळ असलेल्या परिसरात शनिवारी केंद्रीय राखील पोलीस दलाच्या जवानांवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्याला प्रत्यत्तर देताना सीआरपीएफचे 22 जवान शहिद झाले तर अनेक जवान बेपत्ता झाले होते. या घटनेबद्दल बोलताना छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते रमण सिंग  यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर आरोप केले आहेत. इकडे छत्तीसगडमध्ये जवान शहिद होत असताना तिकडे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे आसाम मध्ये निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त होते असे म्हणत "रोम जळत असताना निरो बासरी वाजवत होता" असे चित्र निर्माण झाल्याचा आरोप केला आहे. 

दरम्यान आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(Amit Shah) हे घटनास्थळी भेट देणार असून, त्यानंतर ते जखमी जवान उपचार घेत असलेल्या दवाखान्यात देखील भेट देणार असल्याचे समजते आहे. तर आसाम दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) हे देखील रविवारीच छत्तीसगडमध्ये (Chattisgarh) दाखल होणार असल्याची माहिती मिळाली होती. तसेच या घटनेत सुरक्षा यंत्रणा कुठेच कमी पडल्या नसल्याचे सीआरपीएफचे (CRPF) महासंचालक कुलदीप यांनी काळ स्पष्ट केले आहे.  

संबंधित बातम्या