माजी मुख्यमंत्री कमलनाथ सर्वोच्च न्यायालयात

माजी मुख्यमंत्री कमलनाथ सर्वोच्च न्यायालयात
Former Chief Minister Kamal Nath In the Supreme Court


नवी दिल्ली : मध्य प्रदेशच्या पोटनिवडणुकीसाठी स्टार प्रचारकाचा दर्जा रद्द केल्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते कमलनाथ यांनी निवडणूक आयोगाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ज्येष्ठ वकिल आणि राज्यसभेतील खासदार विवेक तनखा म्हणाले की, कमलनाथ यांनी सर्वोच्च न्यायालयाला याचिकेवर तातडीने सुनावणी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, कमलनाथ म्हणाले, की माझ्यावर मध्य प्रदेशच्या नागरिकांचा संपूर्ण विश्‍वास आहे. सध्याचे सरकार हे सौदेबाजीतून अस्तित्वात आले आहे. दोन वर्षापूर्वीच जनतेने भाजपला नाकारले होते.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com