Manpreet Singh Badal: पंजाब काँग्रेसला मोठा धक्का, मनप्रीत सिंग बादल यांचा भाजपमध्ये प्रवेश

Manpreet Singh Left congress: पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीचे (PPCC) नेते मनप्रीत बादल यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला.
Manpreet Singh Left congress
Manpreet Singh Left congressDainik Gomantak

Manpreet Singh Left congress: पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीचे (PPCC) नेते मनप्रीत बादल यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर बादल दिल्लीतील भाजप मुख्यालयात पोहोचले. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना पाठवलेल्या राजीनाम्याच्या पत्रात बादल यांनी म्हटले आहे की, 'काँग्रेसशी माझा मोहभंग झाला.'

'पंजाबला त्या स्थितीत सोडणार नाही'

आपल्या भाषणात त्यांनी असेही सांगितले की, 'भारतावरील हल्ल्यादरम्यान पंजाबवर 400 वेळा हल्ले झाले. पण आता आम्ही पंजाबला (Punjab) त्या स्थितीत सोडणार नाही. असे अमित शहा म्हणाले होते. ही गोष्ट माझ्या मनाला भिडली.' बादल यांनीही आपला राजीनामा ट्विटरवर शेअर केला आहे.

Manpreet Singh Left congress
Punjab: पंजाब सरकारने घेतला मोठा निर्णय, गाण्यात यापुढे दाखवता येणार नाही 'गन'

त्यांनी राजीनामा पत्रात लिहिले आहे की, “पक्ष आणि सरकारमध्ये माझ्यावर जी काही जबाबदारी सोपवण्यात आली होती ती पूर्ण करण्यासाठी मी माझे सर्वस्व पणाला लावले. मला ही संधी दिल्याबद्दल आणि माझा सन्मान केल्याबद्दल धन्यवाद. दुर्दैवाने, पक्षातील प्रचलित संस्कृती आणि दुर्लक्षित वृत्तीमुळे, मला यापुढे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा (Congress) भाग बनण्याची इच्छा नाही.''

कोण आहेत मनप्रीत बादल?

मनप्रीत बादल हे भटिंडाचे पाच वेळचे आमदार राहिले आहेत. ते 2 वेळा राज्याचे अर्थमंत्री राहिले आहेत. मनप्रीत यांनी 9 वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. बास्केटबॉलमध्येही त्यांनी पंजाबचे प्रतिनिधित्व केले.

Manpreet Singh Left congress
Lawrence Bishnoi Viral Video: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला पंजाब पोलिस का देतायेत शब्बासकी?

भाजपचे वक्तव्य

मनप्रीत यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजप नेत्यांनी सांगितले की, 'त्यांना पंजाबच्या हिताची काळजी आहे. त्यांनी एक अभ्यासू, सक्षम आणि अनुभवी नेता म्हणून पंजाबची सेवा केली आहे. पंजाबमध्ये आज अराजकता पसरली आहे. पंजाबमधील आर्थिक स्थिती चिंताजनक आहे. मनप्रीत यांना त्याची काळजी आहे. जीएसटी कौन्सिलमध्येही मनप्रीत बादल यांचा चांगला आणि संतुलित प्रभाव होता. परिषदेत काम करताना ते देशहिताचे निर्णय घेत असत. मनप्रीत यांच्या पक्ष प्रवेशाने पंजाबमध्ये भाजप मजबूत होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com