माजी केंद्रीय मंत्री जसवंतसिंह यांचे निधन

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी व संस्कार नसतानाही जसवंतसिंह हे प्रथम जनसंघ आणि नंतर भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांमध्ये समाविष्ट होते. १९८० पासून ते २०१४ पर्यंत त्यांनी भाजपचे प्रतिनिधित्व केले.

नवी दिल्ली: माजी अर्थ, परराष्ट्र आणि संरक्षणमंत्री जसवंतसिंह (वय ८२)  यांचे आज येथे लष्करी रुग्णालयात निधन झाले. प्रथम भारतीय जनसंघ आणि नंतर भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते व संसदपटू म्हणून ते ओळखले जात. राजकीय जीवनाच्या अखेरच्या टप्प्यात त्यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली होती व त्यानंतरच्या एका अपघाताने ते अखेरपर्यंत अंथरुणाला खिळून राहिले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी व संस्कार नसतानाही जसवंतसिंह हे प्रथम जनसंघ आणि नंतर भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांमध्ये समाविष्ट होते. १९८० पासून ते २०१४ पर्यंत त्यांनी भाजपचे प्रतिनिधित्व केले. अपवाद म्हणून नव्वदच्या दशकात काहीकाळ ते संसदेत प्रवेश करू शकले नाहीत. जनसंघ-भाजपमध्ये राहूनही त्यांनी ठोकळेबाज किंवा पोथीनिष्ठ भूमिका न घेता एका व्यवहारी राजकीय नेत्याप्रमाणे राजकारण केले. योग्य व उचित कल्पनांबद्दल ते खुले राहत असत. त्यामुळेच इतर राजकीय पक्षांमध्येही त्यांच्याबद्दल आदरभावना होती. 

संरक्षण, परराष्ट्रनिती व अर्थनीती या विषयातील तज्ज्ञ असलेल्या जसवंतसिंह यांच्याकडून भरपूर शिकलो. - पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या