अशोक दिंडा आता राजकारणात 'नशीब' आजमावणार; भाजपमध्ये केला पक्षप्रवेश

Ashok Dinda
Ashok Dinda

पश्चिम बंगालमध्ये यावर्षी विधानसभेच्या निवडणूका होणार आहेत. आणि त्यानुसार राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगाल मध्ये सध्या सत्तेवर असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला जोरदार टक्कर देण्यासाठी भारतीय जनता पक्षाने मोठी तयारी केलेली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाचे नेते एकमेकांवर जोरदार आरोपांची फेरी झाडत असल्याचे दिसत आहे. याशिवाय एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उडी घेणाऱ्या नेत्यांची माहिती मिळत असतानाच काही नवीन चेहऱ्यांची भरती देखील होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मनोज तिवारीनंतर आता भारतीय क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज अशोक दिंडाने देखील राजकीय मैदानात उडी घेतली आहे. 

काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतलेल्या अशोक दिंडाने आज पश्चिम बंगाल मधील निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. कोलकता येथे झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या जाहीर सभेत अशोक दिंडाने अधिकृतपणे पक्षात प्रवेश केल्याची माहिती मिळाली आहे. अशोक दिंडाने  केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष अर्जुन सिंह यांच्या उपस्थितीत कोलकाता येथे झालेल्या सभेत भाजप मध्ये प्रवेश केला. अशोक दिंडाने या महिन्याच्या 2 फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा केली होती. 

त्यानंतर, आजच हुगळीमध्ये झालेल्या तृणमूल कॉंग्रेसच्या सभेत क्रिकेटर मनोज तिवारीने तृणमूल कॉंग्रेसच्या पक्षप्रमुख ममता बॅनर्जी यांच्या उपस्थित तृणमूल कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता. व यानंतर बंगालच्या आगामी विधानसभा निवडणुकीत क्रिकेटर मनोज तिवारीला तृणमूल कॉंग्रेसकडून विधानसभा तिकिट मिळणार असल्याची चर्चा रंगली आहे. मनोज तिवारीने 2008 मध्ये भारतीय क्रिकेटमध्ये प्रवेश केला होता. तर त्याने शेवटचा सामना 2015 मध्ये खेळला होता. तसेच आयपीएलमध्येही त्याने कोलकाता नाईट रायडर्सचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर तृणमूल कॉंग्रेस पक्षात मनोज तिवारी सारख्या एका स्टार प्रचारकाची एन्ट्री झाल्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला फायदा होणार असल्याचा तर्क राजकिय विश्लेषकांकडून करण्यात येत असतानाच आता भाजप मध्ये देखील अशोक दिंडा सारख्या क्रिकेटरने प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपने देखील अशोक दिंडाला पक्षात खेऊन तृणमूल काँग्रेसला 'टिट फॉर टॅट'प्रमाणे शह देण्याचा प्रयत्न केला असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.    

दरम्यान, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 420 बळी घेणारा गोलंदाज अशोक दिंडाने जानेवारी महिन्यात खेळवण्यात आलेल्या सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेन्टी स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. तर अशोक दिंडाने भारताकडून 13 एकदिवसीय आणि 9 टी-ट्वेन्टी सामने खेळलेले आहेत. तसेच 2010 मध्ये झिम्बावे विरुद्धच्या सामन्यातून अशोक दिंडाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या एकदिवसीय प्रकारात पदार्पण केले होते. आणि शेवटचा सामना 2013 मध्ये इंग्लंड सोबत खेळला होता. याशिवाय 2009 मध्ये नागपूर येथे झालेल्या टी-ट्वेन्टी सामन्यातून अशोक दिंडाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. व अहमदाबाद येथे 2012 मध्ये पाकिस्तानविरुद्ध झालेला अखेरचा टी-ट्वेन्टी सामना खेळला होता. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com