दिल्ली दंगली प्रकरणी जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालिदला जामीन 

दैनिक गोमंतक
गुरुवार, 15 एप्रिल 2021

दंगल संबंधित प्रकरणात दिल्ली कोर्टाने जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालिद याला जामीन मंजूर केला आहे.

दंगल संबंधित प्रकरणात दिल्ली कोर्टाने जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालिद याला जामीन मंजूर केला आहे. दिल्लीत झालेल्या दंगल प्रकरणासंबंधित खटल्यांमध्ये पुष्कळ लोकांची ओळख पटलेली नाही आणि त्यांना अटक करावी लागेल, या कारणावरून उमर खालिदला अनिश्चित काळासाठी तुरूंगात ठेवता येणार नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

‘मरकझ’ ला परवानगी देण्यावरुन केंद्र सरकारचा घूमजाव

गेल्या वर्षी दिल्लीतील हिंसाचाराचा आरोपी विद्यार्थी नेता उमर खालिदने जानेवारीत सत्र न्यायालयात याचिका दाखल करत तुरुंगातच संगणकावर दोषारोपपत्र पहाण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली होती. या याचिकेत उमर खालिदने अद्याप आपल्यावर दाखल केलेले आरोपपत्र पाहिले नसल्याचे त्याने नमूद केले होते. शिवाय, तुरुंगातील संगणकावरूनच दोषारोपपत्र दाखवावे अशी मागणी उमर खालिदने केली होती. यानंतर उमर खालिदने पोलिसांनी मीडियामध्ये आरोपपत्र लीक केल्याचा आरोप देखील केला होता. तसेच, आरोपपत्रच मिळालेले नसून, यामुळे न्यायपूर्ण सुनावणीचे उल्लंघन होत असल्याचे उमर खालिदने म्हटले होते. 

 ‘’केवळ लस उत्सवाचे ढोंग’’ असं म्हणत राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

दरम्यान, जानेवारी महिन्याच्या अखेरीस दिल्लीत विधानसभा निवडणुकांच्या काही दिवसांपूर्वी दक्षिणेकडील भागात मोठा हिंसाचार उद्भवला होता. या हिंसाचारात सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते.  

संबंधित बातम्या