Shanti Bhushan Passes Away: ज्येष्ठ वकील शांती भूषण यांचे निधन, वयाच्या 97 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Shanti Bhushan: माजी कायदे मंत्री आणि ज्येष्ठ वकील शांती भूषण यांचे मंगळवारी निधन झाले. ते 97 वर्षांचे होते.
Shanti Bhushan Passes Away
Shanti Bhushan Passes AwayDainik Gomantak

Shanti Bhushan Passes Away: माजी कायदे मंत्री आणि ज्येष्ठ वकील शांती भूषण यांचे मंगळवारी निधन झाले. ते 97 वर्षांचे होते. रिपोर्ट्सनुसार, ते गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांनी आज संध्याकाळी दिल्लीतील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. शांती भूषण यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयातील एका प्रसिद्ध खटल्यात राजनारायण यांची बाजू मांडली होती. या प्रकरणामुळे 1974 मध्ये इंदिरा गांधींना पंतप्रधानपदावरुन पायउतार व्हावे लागले होते.

दरम्यान, मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये (Government) शांती भूषण कायदा मंत्री होते. 1977 ते 1979 या काळात त्यांनी हे पद भूषवले. शांती यांनी त्यांच्या हयातीत जनहिताशी संबंधित अनेक मुद्दे मांडले. भ्रष्टाचाराच्या विरोधात ते आवाज उठवणारे कार्यकर्ते होते.

Shanti Bhushan Passes Away
India: The Modi Question: बीबीसीच्या 'इंडिया: द मोदी क्वेश्चन' माहितीपटाचा वाद सर्वोच्च न्यायालयात

तसेच, 2018 मध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयात एक महत्त्वपूर्ण याचिका दाखल केली, ज्याद्वारे 'मास्टर ऑफ रोस्टर' प्रणालीमध्ये बदल करण्याची मागणी करण्यात आली होती. शांती भूषण यांचे चिरंजीव प्रसिद्ध कार्यकर्ते वकील प्रशांत भूषण आहेत.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याविरुद्ध खटला जिंकला

इंदिरा गांधींवर (Indira Gandhi) निवडणूक जिंकण्यासाठी लाच घेतल्याचा आणि सरकारी यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांनी केला होता. शांतीभूषण यांनी राजनारायण यांच्यासाठी खटला लढवला आणि जिंकला. न्यायमूर्ती जगमोहन लाल सिन्हा यांनी इंदिरा गांधी यांच्यावर खासदार म्हणून बंदी घातली आणि त्यांना पुढील सहा वर्षे निवडणूक लढवण्यास मनाई केली. या निर्णयामुळे राजकीय विरोध झाला आणि भारतात आणीबाणी जाहीर झाली.

Shanti Bhushan Passes Away
JNU-DU नंतर FTII मध्ये विद्यार्थी संघटनेने दाखवली 'इंडिया: द मोदी क्वेशन' डॉक्युमेंट्री

शांतीभूषण यांचा राजकीय प्रवास

शांती भूषण हे काँग्रेस (O) आणि नंतर जनता पक्षाचे सदस्य होते. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत ते राज्यसभेचे खासदारही होते. 1980 मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि 1986 मध्ये भाजपचा राजीनामा दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com