जावेद अख्तर, नसीरुद्दीन शाह यांच्या सपोर्टमध्ये माजी नौसेना प्रमुख लक्ष्मीनारायण
Former Naval Chief Laxminarayan in support of Javed Akhtar, Naseeruddin ShahDainik Gomantak

जावेद अख्तर, नसीरुद्दीन शाह यांच्या सपोर्टमध्ये माजी नौसेना प्रमुख लक्ष्मीनारायण

जावेद अख्तर आणि नसीरुद्दीन शाह यांना पाठिंबा देण्यासाठी 150 नागरिक पुढे आले

जावेद अख्तर (Javed Akhtar) आणि नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांना पाठिंबा देण्यासाठी 150 नागरिक पुढे आले आहेत. अफगाणिस्तान (Afghanistan) ताब्यात घेण्याबाबत तालिबानच्या (Taliban) वक्तव्यानंतर जावेद आणि नसीरुद्दीन यांच्याशी केलेल्या गैरवर्तनाचा निषेध हे सर्व लोकं करत आहेत.

जावेद आणि नसीरुद्दीन यांना पाठिंबा देणाऱ्या नागरिकांनी सांगितले की, "जावेद आणि नसीरुद्दीन यांच्यासोबत केलेल्या वागणुकीचा निषेध करत आहोत. आम्ही सर्व दोघांच्याही समर्थनात आहेत. त्यांना आपले विचार व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि त्यामुळे त्यांना दिलेली धमकी पूर्णपणे चुकीची आहे."

Former Naval Chief Laxminarayan in support of Javed Akhtar, Naseeruddin Shah
पीएचडी, मास्टर डिग्री आता काहीच कामाची नाही: तालिबानी शिक्षण मंत्री

दुसरीकडे, नसीरुद्दीन यांच्या समर्थनार्थ नागरिकांनी वक्तव्य केले. "ते फक्त भारतीय इस्लामच्या सहिष्णु परंपरेची पुनरावृत्ती करत आहेत, जी अलिकडच्या दशकात सौदी प्रभावित वहाबी इस्लामने प्रभावित केली आहे. हा एक ट्रेंड आहे ज्याला भारतीय मुस्लिमांचा एक मोठा वर्ग केवळ ओळखत नाही तर त्याचा निषेध देखील करतो," असे वक्तव्य समर्थकांनी केले.

या निवेदनांवर माजी नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल, लक्ष्मीनारायण रामदास, डॉक्युमेंटरी फिल्ममेकर आनंद पटवर्धन, चित्रपट लेखक अंजुम राजाबाली, लेखक जॉन दयाल आणि सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड, प्रोफेसर एमेरिटा, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि झोया हसन यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

जावेद अख्तर आणि नसीरुद्दीन शाह यांनी काय विधाने केली?

जावेद यांनी अलीकडे एका मुलाखतीदरम्यान म्हटले होते की, "आरएसएस, व्हीएचपी आणि बजरंग दल सारख्या संघटना तालिबान सारख्याच आहेत. भारतीय राज्यघटना त्यांच्या मार्गात अडथळा बनत आहे आणि त्यांना थोडीशी संधी मिळाली तर ते मर्यादा ओलांडण्यास मागेपुढे पाहणार नाहीत."

जावेद यांनी भारतातील अल्पसंख्यांकांच्या मॉब लिंचिंगसंदर्भातही वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, "तालिबानसारखे बनण्यापूर्वी ही ड्रेस रिहर्सल आहे. ते सर्व समान आहेत, फक्त त्यांची नावं वेगळे आहेत."

Former Naval Chief Laxminarayan in support of Javed Akhtar, Naseeruddin Shah
तालिबान्यांनी सरकार स्थापन करताच 'आत्मनिर्भर अफगाणिस्तानची' केली घोषणा

नसीरुद्दीन शहा यांचे विधान

नसीरुद्दीन शाह यांनी तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्याने भारतीय मुस्लिमांच्या एका वर्गाने सेलिब्रेशन केल्याबद्दल टीका केली होती आणि या वर्तवणुकीला चिंतेचे कारण म्हटले होते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com