'कृषी क्षेत्रात व्यापक सुधारणा करण्यापासून मनमोहन सिंग आणि शरद पवारांना बाह्यशक्तींनीच रोखलं'

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 29 डिसेंबर 2020

 कॉंग्रेस आघाडी सरकारच्या कार्यकाळात कृषी क्षेत्रात व्यापक सुधारणा व्हाव्यात, असे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचे मत होते. मात्र या सुधारणा करण्यापासून दोघांनाही बाह्य शक्तींनी रोखले.

नवी दिल्ली :  कॉंग्रेस आघाडी सरकारच्या कार्यकाळात कृषी क्षेत्रात व्यापक सुधारणा व्हाव्यात, असे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचे मत होते. मात्र या सुधारणा करण्यापासून दोघांनाही बाह्य शक्तींनी रोखले, असा आरोप केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केला आहे. काही शेतकरी संघटनांच्या नेत्यांशी बोलताना तोमर यांनी हा आरोप केला. सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या एका महिन्यापासून दिल्लीच्या सीमांवर हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत.

सरकारकडून शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले जाते मात्र कायदे रद्दच करा, या मागणीवर शेतकरी नेते ठाम आहेत. काँग्रेसने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला असला तरी या मुद्यावर डॉ. सिंग यांच्याकडून गेला महिनाभरात एकही सुस्पष्ट प्रतिक्रिया आलेली नाही, असे भाजपचे म्हणणे आहे. या पार्श्‍वभूमीवर तोमर यांनी आज हा आरोप करत  कायदा दुरुस्त्यांसाठी सरकार खुल्या मनाने तयार असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. तोमर यांनी बाह्य शक्तींचे नाव घेतले नसले तरी या पेचप्रसंगात सरकारची भूमिका पाहता तोमर यांचा रोख गांधी घराण्यावर असल्याचे स्पष्ट आहे. 

संबंधित बातम्या