माजी पंतप्रधानांना कोरोनाची लागण; प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिलं अपडेट

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 1 एप्रिल 2021

कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात सध्या चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली पाहायला मिळत आहे.

कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात सध्या चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर देशातील वेगवेगळ्या राज्यांत पुन्हा लॉकडाऊन अथवा खबरदारीसाठी म्हणून अन्य निर्बंध लावण्याचे निर्णय घेतले जात आहेत. त्यातच आता देशाचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती मिळाली आहे. एच. डी. देवेगौडा यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. आणि त्यानंतर त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल काल बुधवारी सकारत्मक आला असल्याचे समजते.  

Corona Update : नवीन वर्षात पहिल्यांदाच आढळले कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण

देशाचे माजी पंतप्रधान आणि धर्मनिरपेक्ष जनता दल पक्षाचे नेते एच. डी. देवेगौडा यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. काल बुधवारी एच. डी. देवेगौडा यांची कोरोना चाचणी सकारत्मक आली असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने एच.डी. देवेगौडा यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. सध्याच्या स्थितीला त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे. तसेच त्यांची क्लिनिकल पॅरामीटर्स स्थिर असून, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु असल्याचे रुग्णालयाने म्हटले आहे.    

माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी सोशल मीडियाच्या ट्विटरवरून यासंदर्भातील माहिती दिली आहे. एच. डी. देवेगौडा यांनी ट्विटरवरून आपली पत्नी व स्वतःला कोरोनाची लागण झाल्याचे म्हटले आहे. शिवाय त्यांनी केलेल्या ट्विट मध्ये आपण घरीच क्वारंटाईन होत असल्याचे म्हटले होते. याशिवाय, एच. डी. देवेगौडा यांनी मागील काही दिवसांपासून संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोनाची चाचणी करून घेण्याची विनंती केली होती. दरम्यान, एच. डी. देवेगौडा हे 1 जून  1996 ते 21 एप्रिल 1997 मध्ये भारताचे पंतप्रधान होते.  

संबंधित बातम्या