माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 19 एप्रिल 2021

मनमोहन सिंग यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

देशभरात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. सर्वसामान्यांपासून ते अगदी केंद्रीय मंत्र्यापर्यंत सर्वचजण कोरोनाच्या विळख्यात अडकत चालले आहेत. आता माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण झाली आहे. मनमोहन सिंग यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. (Former Prime Minister Manmohan Singh contracted corona)

दरम्यान कोरोनास्थिती हाताळण्याबाबत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवलेलं आहे. त्यात त्यांनी देशात लसीकरणावर जास्तीत जास्त भर देण्यात यावा याचा उल्लेख केला आहे. त्याचबरोबर लस पुरवठ्यास चालना देण्यासाठी एचआयव्ही-एड्सच्या औषधांप्रमाणे परवाना अनिवार्य करण्याच्या दृष्टीने वेगाने पावले उचलण्यात यावीत अशी सूचना देखील केली आहे.

केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय: दिेल्लीत सहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर

मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्रात पाच कलमी कार्यक्रमाचा उल्लेख केला होता.

1 पुढील पाच महिन्यांसाठी किती लसींची ऑर्डर देण्यात आली आहे ते जाहीर करावे. 2 राज्यांना अपेक्षित असलेला साठा कसा पुरवला जाईल याचे संकेत देण्यात यावेत. 3 राज्यांना फ्रंटलाईन वर्कसची श्रेणी ठरवण्यासाठी सूट देण्यात यावी. 4 लस निर्मिती कंपन्यांना त्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी आणखी सूट देण्यात यावी. 5 वापरासाठी परवानगी दिल्या गेलेल्या कोणत्याही लसीच्या आयातीसाठी परवानगी द्यावी या पाच मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे.

 

संबंधित बातम्या