माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची कोरोनावर यशस्वी मात 

दैनिक गोमंतक
गुरुवार, 29 एप्रिल 2021

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. आज (ता. 29) त्यांना एम्सच्या ट्रॉमा सेंटरमधून घरी  सोडण्यात आले. 19 एप्रिलला मनमोहन सिंग यांचा कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले  होते.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. आज (ता. 29) त्यांना एम्सच्या ट्रॉमा सेंटरमधून घरी  सोडण्यात आले. 19 एप्रिलला मनमोहन सिंग यांचा कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले  होते. मनमोहन सिंग यांना कोरोना लस  'कोवाक्सिन' चे दोन डोस देण्यात आले. ते  88 वर्षांचे असून त्यानं शुगरचा आजार देखील आहे. (Former Prime Minister Manmohan Singh successfully defeats Corona) 

लष्करप्रमुखांनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट; भारतीय सैन्यांची रुग्णालये...

डॉ. मनमोहन सिंग यांच्यावरही दोन बायपास शस्त्रक्रिया झाल्या आहेत.1990 मध्ये  युनायटेड किंगडममध्ये त्यांच्यावर हिली शस्त्रक्रिया झाली होती आणि 2004 मध्ये एस्कॉर्ट रुग्णालयात एंजिओप्लास्टी झाली.  तर 2009 मध्ये एम्समध्ये त्यांची दुसरी बायपास शस्त्रक्रिया झाली. गेल्या वर्षी मे महिन्यात ताप आल्याने मनमोहन सिंग यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. तेव्हाही कोरोनाचा उद्रेक शिगेला पोहचला होता.

ResignModi हॅशटॅग ब्लॉक करण्यामागे कुणाचा दबाव? फेसबुकचं स्पष्टिकरण

दरम्यान, कोरोना महामारीशी लढण्यासाठी मनमोहन सिंग यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला पत्र लिहून पाच उपाययोजना सुचविल्या.  साथीच्या रोगाचा मुकाबला करण्यासाठी लसीकरण आणि औषधांचा पुरवठा वाढविणे आवश्यक आहे. एकूण लसींची संख्या न पाहता लोकसंख्येच्या किती टक्के लसी देण्यात आल्या,  याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे, मनमोहन सिंग यांनी आपल्या पत्रात म्हटले होते. 

संबंधित बातम्या